Pune PMC Elections | पूर्व पुण्याचा नवा ‘धुरंदर’; उच्च शिक्षित, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले; सुरेंद्र पठारेंचा दणदणीत विजय
पुणे: Pune PMC Elections | पूर्व पुण्याच्या राजकारणात यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा उलटफेर घडवत सुरेंद्र पठारे यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर दोन्ही पॅनल लीडने जिंकत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. पूर्व पुण्यात प्रथमच भाजपचे कमळ ठळकपणे फुलले असून, या यशामागे पठारे यांची रणनीती, संघटन कौशल्य आणि प्रभावी जनसंपर्क निर्णायक ठरला आहे. सुरेंद्र पठारे हे प्रभाग ०४ मधून सुमारे १६ हजारहुन अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
सांस्कृतिक नगरीत उपनगरांचा मोठा भाग जोडला गेल्याने, ग्रामीण पट्टा दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र यंदा भाजपने या भागावर विशेष लक्ष केंद्रित करत नवे चेहरे आणि तरुण पिढीला सोबत घेत संघटन मजबूत करण्याची दिशा घेतली. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली.
उच्च शिक्षित, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या पठारे यांनी तळागाळापर्यंत पोहोचत मतदारांचा विश्वास संपादन केला. पूर्व पुण्याचा विकास मॉडेल प्रभावीपणे मांडत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. परिणामी पत्नी ऐश्वर्या पठारे आणि स्वतःचा संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आला. त्यामुळे पठारे कुटुंबाचा राजकारणातील प्रवेश औपचारिक न राहता प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, पूर्व पुण्यात भाजपची ताकद मर्यादित मानली जात असताना मिळवलेले हे यश पक्षासाठी मैलाचा दगड ठरत आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणाबरोबरच आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाले आहे.
राजकारणात नव्याने आलेल्या सुरेंद्र पठारे यांनी पहिल्याच परीक्षेत चमकदार कामगिरी करत पूर्व पुण्याचा नवा ‘धुरंदर’ अशी ओळख निर्माण केली आहे. मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर केंद्रित नियोजन आणि तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उभारलेली संघटनात्मक बांधणी हेच त्यांच्या विजयाचे प्रमुख सूत्र ठरल्याचे त्यांनी विजयानंतर सांगितले.
