Pune PMC Elections | प्रभाग 11: हर्षवर्धन दीपकभाऊ मानकर आणि मित्र परिवाराच्या दिवा प्रतिष्टानचे कार्य कौतुकास्पद – सिनेअभिनेते प्रविण तरडे
पुणे : Pune PMC Elections | गेल्या ८ ते १० वर्षापासून हर्षवर्धन मानकर आणि मित्र परिवाराकडून दिवा प्रतिष्टानच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्यक्रमांना मी येत आहे. दीपकभाऊ मानकर यांनी जसे प्रभागातील प्रत्येक नागरिकाला आपला परिवारातील सदस्य मानून त्यांची सेवा केली तोच वारसा भक्कमपणे पुढे नेण्याचे काम हर्षवर्धन मानकर हे करत आहे. हर्षवर्धन मानकर व त्यांच्या संपूर्ण पॅनेलला भरघोस मतदान करून त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे अशा शब्दात सिनेअभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी उपमहापौर दीपकभाऊ मानकर, सिनेअभिनेते प्रविण तरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर मधील सुवर्णयुग मित्र मंडळ, अखिल भारतीय वाल्मिकी समाज, स्वराज्य ग्रुप, राम प्रतिष्ठान, बाल तरुण मंडळ,हरिओम मंडळ, नवयुग मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान, क्रांतिवीर मित्र मंडळ, जय भारत मंडळ, सोहम प्रतिष्ठान तसेच संयुक्त हनुमान मित्र मंडळ यांच्या प्रतिनिधींची आणि स्थानिक नागरिकांची एकत्रित बैठक उत्साहात झाली. यावेळी फटक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव करत दीपक मानकर व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे उपस्थित नागरिकांनी जंगी स्वागत केले.
तरडे म्हणाले की, हर्षवर्धन मानकर कामासाठी सदैव तत्पर असतात. कामांची माहिती घेऊन, नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचा त्यांचा स्वभाव आहे. हि निवडणूक महानगरपालिकेची असून कोणताही पक्ष न बघता काम करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच श्री. हर्षवर्धन मानकर यांच्या पॅनेलला विजयी करा असेही आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दीपक मानकर यांनी दिली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर मधील श्री. हर्षवर्धन मानकर, सौ. तृप्ती शिंदे, सौ.कांता खिलारे या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेस राजा खडतरे,चंद्रकांत कुदळे, सतीश शिंदे, मकवाना अंकल, शिंदे मामा, नियोजन करणारे गणेश लंगे, बाळासाहेब गायकवाड,अमित मकवाना, आशिष पोकळे, सिद्धेश बोराडे, भैय्या हलंदे, अभिजित गायकवाड, अविनाश गायकवाड, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला,तरुण-तरुणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
