Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 03 : ‘राजमाता जिजाऊ संकल्पनामा प्रत्यक्षात उतरवू ! भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा निर्धार
पुणे: Pune PMC Elections |
“जिजाऊंच्या लेकी आम्ही
विकासाचे गीत गाऊ
स्वतःही घडू आणि
प्रभाग क्रमांक ०३ घडवू”
राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘जिजाऊंच्या लेकीकडून जिजाऊंच्या लेकींसाठी’ असलेला जाहीरनामा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही चौघेही जण कार्यरत राहू”, असे मत भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.
लोहगाव येथे आयोजित कार्यक्रमात ‘राजमाता जिजाऊ संकल्पनामा’ नागरिकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. हा संकल्पनामा लोहगाव-विमाननगर-वाघोली परिसरातील महिलांसाठी खास तयार करण्यात आला असून तो आरोग्य, सुरक्षा, कौशल्यविकास व आर्थिक सक्षमीकरण या चार मजबूत स्तंभांवर उभा आहे.
यावेळी बोलताना ऐश्वर्या पठारे म्हणाल्या की, “महिला सशक्त असेल तर कुटुंब सशक्त होते, कुटुंब सशक्त असेल तर समाज आणि प्रभाग आपोआप प्रगती करतो. म्हणूनच हा जाहीरनामा महिलांच्या रोजच्या गरजांशी जोडलेला प्रत्यक्ष कृतीचा आराखडा आहे.”
संकल्पनाम्यात महिलांच्या आरोग्यासाठी दरवर्षी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोगासाठी नियमित तपासणी शिबिरे आणि प्रतिबंध ते उपचाराची साखळी उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या कौशल्यविकासासाठी संत मुक्ताई नॉलेज सेंटर स्थापन करून गृहउद्योग, स्टार्टअप, इंग्लिश स्पीकिंग, रोजगार मार्गदर्शन व एआय आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने संत जनाई बस सेवा, सर्व गल्ल्यांमध्ये प्रकाशव्यवस्था, २४×७ महिला हेल्पलाईन, तात्काळ ॲम्ब्युलन्स सेवा व सुरक्षित महिला-केंद्रित को-वर्किंग स्पेस उपलब्ध करून देण्याची तरतूद संकल्पनाम्यात करण्यात आली आहे. तसेच महिला क्रीडापटू, विद्यार्थिनी, गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलींसाठी आर्थिक सहाय्य व शिष्यवृत्तीची स्पष्ट तरतूद नमूद केली आहे.
“हा संकल्पनामा म्हणजे जिजाऊंच्या विचारांवर उभा राहिलेला महिलांसाठीचा विकास आराखडा आहे. महिलांना संरक्षणासोबतच सन्मान, संधी आणि स्वावलंबन देणारी व्यवस्था उभी करणे हाच आमचा उद्देश आहे,” अशी भूमिका ऐश्वर्या पठारेंसह डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव व रामदास दाभाडे यांनी स्पष्ट केली.
या कार्यक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित महिलांनी या संकल्पनाम्याचे स्वागत करत तो प्रत्यक्षात उतरवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ०३ मध्ये महिला-केंद्रित, लोकाभिमुख व दूरदृष्टी असलेले नेतृत्व घडताना दिसत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. ‘राजमाता जिजाऊ संकल्पनामा’मुळे लोहगाव-विमाननगर-वाघोलीमध्ये महिलांच्या सशक्तीकरणाची एक नवी दिशा उघडली असून निवडणुकीच्या रिंगणात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
भाजपा-आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे व रामदास दत्तात्रय दाभाडे यांना व त्यांच्या एकूणच विकासाबाबतच्या मुद्यांना नागरिकांना चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
