Pune PMC Elections | प्रभाग क्र. 04 मध्ये पदयात्रेतून थेट संवाद; नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य

Pune PMC Elections | Ward No. 04 Padayatra Focuses on Direct Public Interaction; Citizens’ Issues Take Priority

पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ मधील आव्हाळवाडी रोड, बजरंग नगर, सिद्धी पार्क, काळूबाई नगर तसेच गायत्री पाटील उंद्रे हौसिंग लाईन परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्थानिक प्रश्नांचा आढावा घेतला.

या वेळी उमेदवार सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांच्यासह प्रभाग क्रमांक ०४ मधील शैलजीत जयवंत बनसोडे, रत्नमाला संदीप सातव व तृप्ती संतोष भरणे उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी परिसरातील मूलभूत सुविधा, नागरी सोयी, पायाभूत प्रश्न तसेच दैनंदिन अडचणींबाबत मते मांडली.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या समस्या व सूचनांची नोंद घेत या सर्व प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने व नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येतील, असा विश्वास उमेदवारांनी दिला. लोकसहभागातूनच विकासाचा आराखडा प्रभावी ठरतो, अशी भूमिका यावेळी सुरेंद्र पठारे यांनी मांडली.

भारतीय जनता पक्षाला नागरिकांची पसंती

प्रभाग क्रमांक ०४ मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमदेवारांकडून खराडी-वाघोली भागात काढण्यात येणाऱ्या पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय.

आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत अ गटातून शैलजीत जयवंत बनसोडे, ब गटातून रत्नमाला संदीप सातव, क गटातून तृप्ती संतोष भरणे व ड गटातून सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून पाठिंबा द्यावा, असे आवाहन नागरिकांशी संवाद साधताना करण्यात आले.