Pune PMC Elections | प्रभाग क्र. 09 (पुणे) : ‘मी अमोल बालवडकर यांना कधी भेटलो नाही, पण त्यांचे काम बोलतयं, बालेवाडीतील भाजप समर्थक सचिन काकडे यांनी व्यक्त केली सर्वसामान्यांच्या मनातील भावना (Video)

Pune PMC Elections | Ward No. 09 (Pune): 'I have never met Amol Balwadkar, but his work speaks for itself,' expressed Sachin Kakde, a BJP supporter from Balevadi, reflecting the feelings of the common people (Video)

पुणे : Pune PMC Elections | मी भाजपचा समर्थक आहे मी कधी अमोल बालवडकर यांना भेटलो नाही. पण, त्यांनी आजवर केलेल्या कामाचा चाहता आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या अहोरात्र नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्‍या कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारुन कामाच्या माणसाचे राजकारण संपविण्याचा घाणेरडा प्रकार झाल्याने आम्ही भाजपचे मतदार असलो तरी यावेळी अमोल बालवडकर यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे बालेवाडी येथील रहिवासी सचिन काकडे यांनी सांगत सर्वसामान्य मतदारांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

https://www.instagram.com/p/DTPOfVEiOl8/?hl=en

प्रभाग क्रमांक ९ सूस, बाणेर, पाषाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. या भागातील झोपडपट्टी, मध्यमवर्गीय मतदारांपासून अगदी कॉर्पोरेटमधील तरुण मतदार अमोल बालवडकर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये अमोल बालवडकर हे भाजपच्या उमेदवारांसाठी घरोघरी गेले होते. त्यातून या प्रभागातून भाजप उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले होते. असे असताना कामाच्या माणसाला भाजपने तिकीट नाकारल्याने एरव्ही भाजपचे असलेले मतदार आज महापालिका निवडणुकीत अमोल बालवडकर यांच्या पाठीशी एकवटले असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य म्हणजे बालेवाडी परिसरातील अनेक उच्चभ्रु मतदार ज्यांना अमोल बालवडकर कधी भेटले नाहीत. असेही मतदार त्यांचे काम पाहून स्वत:हून व्हिडिओ बनवून पाठवत त्यांना विजयाच्या शुभेच्छा देत आहे.

सचिन काकडे यांनी पाठविलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, की मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवत आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून अमोल बालवडकर उभे आहेत. एक इमानदार, कामाचा माणूस मी कधी त्यांना भेटलो नाही. पण, त्यांचे काम दिसतंय, आजच्या तारखेला तो सर्वात चांगला उमेदवार आहे.

कोविड काळात त्याने त्याच्या कार्यालयात लसीकरणाची सोय केली होती. असंख्य लोकांना याकाळात त्याने मदत करुन दिलासा दिला होता. बालेवाडी येथील प्रमुख समस्या म्हणजे वाहतूक कोंडी़ ही कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर यांनी स्वत:चे वॉर्डन नेमून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे संरजाम योजना दिवाळीमध्ये मराठवाडा, विदर्भ तसेच इतर ठिकाणाहून या भागात कामासाठी आलेल्या कामगारांच्या घराघरात दिवाळी भेटवस्तू पोहचवुन त्यांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचा एक चांगला उपक्रम ते राबवितात.

बालेवाडी येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परिसरातील सफाईचे काम त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडविला आहे. मी भाजपचा स्वयंसेवक, पण यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या कामाच्या माणसाला नगरसेवक करणार आहे. ज्या लोकांसाठी त्यांनी लोकसभा, विधानसभेसाठी काम केले. त्याच लोकांनी अशा कामाच्या माणसाचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही सर्व कॉर्पोरेट जगतातील लोक त्यांच्या पाठीशी उभे आहोत. अमोल बालवडकर हे निवडून तर येणारच आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्यांनी अमोल बालवडकर यांना निवडुन आणून त्यांचा गुलाल उधळायचा आहे. असे सचिन काकडे यांनी मत व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, ही निवडणुक आता जनतेने हातात घेतली आहे. प्रभागासाठी काम करताना मी कधी दिवस पाहिला नाही की रात्रही पाहिली नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी झटलो. आज लोक व्हिडिओमधून जे प्रेम, पाठिंबा आणि प्रतिक्रिया पाठवत आहेत. तीच या कामाची खरी पोचपावती आहे.

माझ्या या उमेदीच्या काळात तुमची साथ, आर्शिवाद आणि विश्वास मला अधिक ताकदीने लढण्याची ऊर्जा देत आहे. तुमचे आभार मानण्यापेक्षा, मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन, तुमच्या व्हिडिओ प्रतिक्रिया पाठवत रहा. तुमचा आवाजच आता या निवडणुकीचा खरा चेहरा आहे.

You may have missed