Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 13 पुणे स्टेशन-जयजवाननगर ! राष्ट्रवादीच्या विकारअहमद मुख्तार शेख यांना जुना बाजार विक्रेते संघटनेचा  पाठिंबा; 40 वर्षापासून मुख्तार शेख हे मदतीला येतात धावून

Pune PMC Elections | Ward No. 13 Pune Station-Jaijawannagar! NCP's Vikar Ahmed Mukhtar Shaikh gets support from Juna Bazaar Vendors' Association; Mukhtar Sheikh has been coming to help for 40 years

पुणे : Pune PMC Elections | जुना बाजार पूर्वी रस्त्यावर भरायचा. महापालिकेचा अतिक्रमण विभाग वारंवार कारवाई करुन आमचे सामान उचलून घेऊन जात असे. त्यावेळी मुख्तार शेख हे धावून येत असत. त्यांच्यामुळेच रस्त्यावरचा बाजार आता चांगला वसला गेला आहे. गेली ४० वर्षे मुख्तार शेख संकटाच्या वेळी धावून येतात. आता त्यांचा मुलगा विकारअहमद मुख्तार शेख हे महापालिका निवडणुकीत उभे आहेत, आमच्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा त्यांना असल्याचे जुना बाजार विक्रेते संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले़

विकारअहमद मुख्तार शेख हे प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन – जयजवाननगर यामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक लढवत आहे. जुना बाजार संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत जुना बाजार संघटनेचे सेक्रेटरी शंकर किस्तुरकर यांनी सांगितले की, गेली ४० वर्षे मुख्तार शेख हे आमच्या संपर्कात आहेत. महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली की एक फोन केला की मुख्तारभाई मदतीला हजर असतात. कोणताही कार्यकर्ता गेले की, मुख्तारभाई अध्या रात्री त्याच्या पाठीशी उभे रहतात. ते कार्यकर्ते म्हणून खूप मोठे आहेत. मंगळवार पेठेत एका शब्दाला ते उभे राहतात, हा आमचा मागील ४० वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा मुलगा विकारअहमद मुख्तार शेख उभा राहिला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

झैद सय्यद अहमद म्हणाले,  जुना बाजारात जेव्हा जेव्हा संकटात येत, तेव्हा मुख्तार शेख आमच्या पाठीशी उभे राहिल आहेत. वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे. विकारअहमद मुख्तार शेख यांना आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे.

आशा सचिन पाटील यांनी सांगितले की, जुना बाजार वसविण्यास मुख्तारभाई शेख यांनी खूप मदत केली. त्यामुळे आम्ही दुसर्‍या कोणाला मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही.

मंजूनाम श्याम संखे यांनी सांगितले की, जुन्या बाजारासाठी मुख्तार शेख यांनी खूप मोठे काम केले आहे. आज बाजाराला व्यवस्थित स्वरुप आले आहे, त्यामागे मुख्तार शेख यांचा सिंहाचा वाटा आहे. आरती बिसुरे म्हणाल्या की, पूर्वी रोडवर बाजार होता. त्यामुळे बाजारात येणार्‍या ग्राहकालाही त्रास होत असे. पूर्वी चौकाजवळ असलेला हा बाजार आता व्यवस्थित बसला आहे. आता अतिक्रमणचा त्रासही संपला आहे. त्यामुळे आम्हाला मदत करणार्‍या मुख्तारभाई यांचा मुलगा विकारअहमद शेख यांना आमचा एकमुखी संपूर्ण पाठिंबा आहे. 

जुना बाजार परिसर, मंगळवार पेठ भागात मुख्तार शेख यांनी गेल्या ४० वर्षामध्ये केलेल्या कामाची लोकांना अजूनही आठवण आहे. त्याचा परिणाम त्यांचे पुत्र विकारअहमद मुख्तार शेख यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

You may have missed