Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 23 : सर्वसामान्य पुणेकरांचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा – अजित पवार
पुणे : Pune PMC Elections | सर्वसामान्य पुणेकरांना स्वच्छ पाणीपुरवठा, चांगले रस्ते, झोपडपट्टी पूनर्वसन, आरोग्य व शिक्षण सुविधा पुरविणे हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
भवानी पेठ येथे प्रभाग क्रमांक २३ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहबाज खान व त्यांच्या सहकार्यांसाठी आयोजित भव्य प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, कचरा, पाणी टंचाई, खड्डे, वाहतुकीची समस्या, प्रदुषित हवा, पर्यावरणाचे वाढते धोके हे महापालिकेतील मुलभूत प्रश्न आहेत, याकडे महापालिकेतील कारभार्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रश्न आणखी उग्र बनले आहेत. भवानी पेठ, रविवार पेठ, नाना पेठ या व्यापारी पेठांमध्ये वाहतूकीची समस्या तीव्र झाली आहे. या परिसरातील झोपडपट्टी पूनर्वसन, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा मजबूत करण्यावर आमचा भर असणार आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून केला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहबाज खान हे संपूर्ण प्रभागात पदयात्रा करुन परिसर पिंजून काढत आहे. त्यांना ठिकठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास शाहबाज खान यांनी व्यक्त केला आहे.
