Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ-नाना पेठ : खान शहाबाज मोहमद शरीफ म्हणतात – ‘‘प्रभाग हा माझा दुसरा परिवारच’’ (Video)
पुणे : Pune PMC Elections | आमच्या घरात गेली २५ वर्षे समाजकार्याची परंपरा आहे. माझे दोन मामा, आई हे या भागातून २५ वर्षे नगरसेवक होते. त्यामुळे मला लहानपणापासून समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे प्रभाग हा माझा दुसरा परिवारच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठमधील उमेदवार खान शहाबाज मोहमद शरीफ म्हणत होते.
रविवार पेठ -नाना पेठ या प्रभागात सध्या जोरदार चुरस निर्माण झाली आहे. या प्रभागातून यापूर्वी वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडुन गेले होते. त्याचबरोबर या प्रभागात यावेळी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढत आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाहबाज खान यांनी सांगितले की, माझे मामा रशीद खान हे १९९७ पासून २०१२ पर्यंत या परिसरातून नगरसेवक म्हणून निवडुन येत होते. त्यानंतर २०१२ मध्ये माझी आई निवडून आली होती. त्यानंतर माझे मामा रफिक शेख हे नगरसेवक होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये समाज कार्याची मोठी परंपरा आहे. मी लहानपणापासून माझे मामा, आई हे लोकांशी कसे संवाद साधतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कसे झटतात, हे पहात आलो आहे. या कामाचे बाळकडु मला त्यांच्याकडून मिळाले आहे. त्यांच्या आदर्शावरच माझी पुढील वाटचाल सुरु आहे.
लोकांचा प्रतिसाद, प्रेम याविषयी शाहबाज खान यांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी माझ्या आईचे दु:खद निधन झाले. पण लोकांनी मला इतके प्रेम, माया दिली की, आईची कमी जाणवुन दिली नाही. प्रभाग २३ मधील महिला, बहिणी यांनी प्रेम, माया दिल्याने आमचे घर या दु:खातून सावरु शकले.
घरातील राजकीय वातावरणामुळे मला लहानपणापासून लोकांची कामे करण्याची आवड निर्माण झाली. कोणाचीही समस्या समोर आली तर जमिनीवर राहून ती सोडविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून पक्षाची उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
स्वच्छ पाणीपुरवठा, चांगली आरोग्य सुविधा, उत्तम शिक्षण व्यवस्था प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करुन देणे ही माझी प्राथमिकता राहणार आहे़ या व्यापारी पेठांमध्ये नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे़ ती सोडविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला संधी दिली आहे. आता ही एक मोठी जबाबदारी आली आहे. मतदारांच्या आशिर्वादाने या संधीचे सोने करुन दाखविण्याचा माझा संकल्प आहे. मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हा विश्वास मी खरा करुन दाखवेन, असे वाटते.
