Pune PMC Elections | पुणे – प्रभाग क्रमांक 09 : राष्ट्रवादीची ‘विजयी संकल्प सभा’ पाषाण येथे संपन्न; अमोल बालवडकरांना वाढते जनसमर्थन

Pune PMC Elections | Ward No. 9: NCP’s ‘Vijayi Sankalp Sabha’ Held at Pashan; Growing Public Support for Amol Balwadkar

पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सुतावाडी, सोमेश्वरवाडी) मध्ये आयोजित करण्यात आलेली ‘विजयी संकल्प सभा’ पाषाण येथील ज्ञानदीप मंगल कार्यालय, बालाजी चौक येथे मोठ्या उत्साहात आणि जनसहभागात पार पडली.

या सभेस मा. आमदार राहुल भैय्या मोटे, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित, तसेच मा. आमदार विजय भांबळे आणि मा. आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी प्रभागातील विकासकामे, भविष्यातील दिशा आणि नागरिकांच्या अपेक्षांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्या, मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाबाबत पक्षाची ठोस भूमिका मांडली.

सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे अमोल बालवडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले. प्रभाग क्र. ९ च्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच पुढील वाटचाल अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You may have missed