Pune PMC Elections | ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर

Pune PMC Elections | Will build a well-equipped hospital for senior citizens: Raghavendra Bappu Mankar

पुणे: Pune PMC Elections | प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले. प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मानकर बोलत होते. यावेळी बाप्पू मानकर यांच्यासह, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.

‘प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना नियमित आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या ज्येष्ठांना प्रभागातच सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्य्मातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला, यापूढेही ज्येष्ठांसाठी हा तुमचा मुलगा कायम सज्ज असेल’, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले.

या मेळाव्यास मा. शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed