Pune PMC Elections | पुणे : प्रभाग 9 मध्ये अमोल बालवडकरांना कष्टकरी बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा ! “तुम्हालाच मतदान करून विजयी करू”; नागरिकांचा ठाम विश्वास

Amol Balwadkar

पुणे : Pune PMC Elections | पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त गणराज चौकातून जात असताना कष्टकरी बांधवांनी आपुलकीने गाडी थांबवत अमोल बालवडकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि तुम्हालाच मतदान करून विजयी करू,” असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/DTCmfeNDDFc/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या प्रसंगाबद्दल बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, हा पाठिंबा म्हणजे गेल्या काळात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचीच पावती आहे. “गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वच नागरिक एकाच भावनेने साथ देत माझ्यावर विश्वास व्यक्त करत आहेत, याचे मनापासून समाधान आहे,” असे त्यांनी सांगितले. या विश्वासामुळे प्रभागातील प्रत्येक जिवाभावाच्या नागरिकासाठी अधिक जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “नागरिकांनी दाखवलेला हा विश्वासच माझी खरी ताकद आहे; तोच मला प्रत्येक पावलावर पुढे जाण्याची ऊर्जा देतो,” असे त्यांनी शेवटी नमूद केले.

प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गायत्री मेढे-कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) निवडणूक रिंगणात आहेत.

You may have missed