Pune PMC News | पुणे शहरातील उघड्यावरील 60 टक्के ‘उकीरडे’ बंद ! मध्यवर्ती शहरापेक्षा उपनगरांतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक

PMC

पुणे : Pune PMC News | स्वच्छ भारत स्पर्धेसाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मागील सहा महिन्यांत नागरिकांकडून ज्याठिकाणी कचरा टाकला जातो अशा ९२८ क्रॉनीक स्पॉटपैकी ६३० स्पॉट बंद केले आहेत. तर बंद केलेल्या क्रॉनीक स्पॉटपैकी २१४ ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. मध्यवर्ती शहरापेक्षा उपनगरांमध्ये कचरा साठून राहाणारे क्रॉनीक स्पॉट अधिक आहेत.

महापालिका प्रशासनाने कचरा पेटी मुक्त योजनेची अंमलबजावणी केल्यानंतर शहरातील कचरा साठून राहाणारे ९२८ क्रॉनीक स्पॉट निश्‍चित केले होते. यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ठिकाणांचाही समावेश आहे. घन कचरा विभागाने मागील सहा महिन्यांत या ठिकाणच्या परिसरात घरोघरी जावून कचरा उचलणारी यंत्रणा निर्माण करत तसेच घंटागाड्या उपलब्ध करून देत हे क्रॉनीक स्पॉट कमी करण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत ६३० स्पॉट बंद करण्यात आले असून उर्वरीत २९८ स्पॉटस्ही लवकरच बंद करण्यात येतील, अशी माहिती घन कचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. (Pune PMC News)

हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत सर्वाधीक अर्थात १५३ क्रॉनीक स्पॉट होते त्यापैकी १०८ बंद करण्यात आले आहेत.
त्याखालोखाल नगर रोड वडगावशेरी अंतर्गत १३१ स्पॉटपैकी ७३ बंद करण्यात आले आहेत.
याउलट कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत फक्त चारच क्रॉनीक स्पॉट होते त्यापैकी तीन बंद करण्यात आले.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत २१ स्पॉटपैकी १९ स्पॉट बंद करण्यात आले आहेत.
तर बिबवेवाडी, धनकवडी सहकारनगर, शिवाजीनगर आणि ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत पाच ते आठ क्रॉनीक स्पॉटच शिल्लक राहील्याचेही कदम यांनी नमुद केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed