Pune PMC News | महापालिकेच्या स्थायी, शहर सुधारणा, विधी, शिक्षण, क्रीडा समित्यांवर नवीन सदस्यांची नियुक्ती; स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले प्रमुख दावेदार

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, शिक्षण, क्रीडा आणि नाव समितीच्या सदस्यांची आज विशेष सर्वसाधारण सभेत नियुक्ती झाली. लवकरच या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठीची निवडणूक होणार आहे. विशेषत; महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाकडे सर्वांचे लक्ष लागले असून या समितीमध्ये निवड झालेले माजी सभागृह नेते व ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले  हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीनंतर नुकतेच महापौर आणि उपमहापौर निवड झाली. महापौर व उपमहापौर पदाप्रमाणेच सत्ताधारी भाजपकडून अध्यक्षपदासाठी इच्छुकांची रांग लागली होती.  महापौर पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने संधी हुकलेले श्रीनाथ भिमाले यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक व शहरअध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, बॉबी टिंगरे यांच्यासह महीला सदस्यांची नावे देखिल स्पर्धेत होती. परंतू आज भाजपकडून स्थायी समितीसाठी निवडलेल्या नावांमध्ये वरिल प्रमुख दावेदारांपैकी एकमेव श्रीनाथ भिमाले यांचे नाव आल्याने अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळयात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यात वरिल सर्व समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक होईल, अशी माहिती नगरसचिव कार्यालयामार्फत देण्यात आली.  विविध समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे

स्थायी समिती :- रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, दादा कोद्रे, श्रीनाथ भिमाले, मयुरी कोकाटे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, रत्नमाला सातव, निशा मानवतकर (सर्व भाजप), अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), प्रशांत जगताप (कॉंग्रेस)

विधी समिती :- अर्चना जगताप, हर्षदा भोसले, सिद्धी शिळीमकर, स्वरदा बापट, ऍड मिताली सावळेकर, पूजा पांचाळ, पायल तुपे, शैलजीत बनसोडे, वर्षा साठे, हरिदास चरवड (सर्व भाजप), रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
साहिल केदारी (कॉंग्रेस)

शहर सुधारणा समिती :- मारुती तुपे, श्रेयस खांदवे, किशोर धायरकर, श्रीकांत जगताप, सपना छाजेड, मृणाल कांबळे, स्वप्नाली पंडीत, पुनीत जोशी, स्मिता वस्ते, सुभाष नाणेकर (सर्व भाजप), स्वप्नील दुधाणे, अजित घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), रफिक शेख (कॉंग्रेस)

महिला व बाल कल्याण समिती :-उज्वला जंगले, अल्पना वरपे, अर्चना पाटील, कोमल शेंडकर, तन्वी दिवेकर, भक्ती गायकवाड, रोहिणी चिमटे, ज्योती गोसावी, ऐश्वर्या थोरात, ज्योत्स्ना कुलकर्णी (सर्व भाजप), सुरेखा कवडे, प्रिया गदादे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), अश्विनी लांडगे (कॉंग्रेस).

क्रीडा समिती :-अपूर्व खाडे, किशोर धनकवडे, सई थोपटे, तेजश्री पवळे, नारायण गलांडे, रेश्मा बराटे, स्नेहा माळवदे,  दिनेश माथवड, व्यंकोजी खोपडे, महेश आवळे (सर्व भाजप), गौरव घुले, प्रतीक कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी),सय्यद काशीफ फकरूल (कॉंग्रेस).

शिक्षण समिती :- अरुण राजवाडे, अतुल तरवडे, ऐश्वर्या पाटील, निवेदिता एकबोटे, मनिषा बुटाला, सारिका घुले, वृषाली रिठे, कोमल नवले, विना घोष, कुणाल टिळक (सर्व भाजप), हर्षवर्धन मानकर, शीतल सावंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी),
अरविंद शिंदे (कॉंग्रेस)

नाव समिती :- शैलजा भोसले, सुनील पांडे, सायली वांजळे, अश्विनी भंडारे, रुपाली पवार, रामदास दाभाडे, उज्वला यादव, विवेक यादव, पल्लवी जावळे, खंडू सतीश लोंढे (सर्व भाजप), गणेश कल्याणकर, श्वेता घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी),
वैशाली भालेराव (कॉंग्रेस)

You may have missed