Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

पुणे : Pune PMC News | राजाराम पुलाजवळील (Rajaram Pool) मैला पाणी प्रक्रिया केंद्रात (Sewage Treatment Plants -STP) प्रक्रिया केलेले पाणी तळजाई वनविभागातील झाडांना देण्यासाठी महापालिका चाचपणी करत आहे. यासंदर्भात वनविभागाकडे देखिल विचारणा करण्यात आली असून त्यांच्या मान्यतेनंतरच आवश्यक आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P) यांनी दिली.
तळजाई वनविभागाचे क्षेत्र अगदी सिंहगड रस्त्यालगतच्या (Sinhagad Road) कॅनॉलपासूनच सरू होते. पर्वती टेकडीच्या मागील भागापासून धनकवडी आणि दशिक्षेकडे वडगावपर्यंत हे क्षेत्र आहे. वन विभागाने येथील वृक्षराजीची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे. वन परिसर टेकडीवर असल्याने झाडांना पाणी देण्यासाठी उन्हाळयात अगदी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरच राजाराम पुलाजवळील महापालिकेच्या एसटीपी मधील प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडण्यात येणार्या पाण्यापैकी काही पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून वनविभागाला पुरविता येईल का याची चाचपणी आज एसटीपी आणि नंतर तळजाई वनाला भेट देउन करण्यात आली. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकार्यांसोबतही चर्चा करण्यात आली असून लवकरच त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. वनविभागाच्या मान्यतेनंतरच या प्रकल्पावर काम करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. (Pune PMC News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या