Pune PMC News | नागरिकांच्या तक्रारी तातडीने निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्त कार्यालयात स्वतंत्र अभ्यांगत कक्षाची स्थापना
पुणे : Pune PMC News | महापालिका आयुक्त कार्यालयात येणार्या नागरीकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली नउ प्रमुख विभागांचे कार्यकारी अभियंता आणि तीन अतिरिक्त कार्यालयांकडील प्रशासन अधिकार्यांचा समावेश असलेली १० जणांचा स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
परिमंडळ दोन चे उपायुक्त अविनाश सपकाळ हे या कक्षाचे अध्यक्ष असतील तर अतिरिक्त महापालिका आयुक्त कार्यालयाचे (विशेष) चे प्रशासन अधिकारी सचिव असतील. या कक्षामध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, पथ, बांधकाम, अतिक्रमण निर्मुलन आणि घन कचरा विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य राहातील. सोमवार ते गुरूवार दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत महापालिका आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात हा कक्ष राहील, असे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. (Pune PMC News)
महापालिकेमध्ये अडीच वर्षापासून प्रशासकराज सुरू झाले आहे. सर्व समित्यांच्या बैठका तसेच सर्वसाधारण सभा या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होतात. नगरसेवक आणि पदाधिकारी नसल्यामुळे नागरिक त्यांची गार्हाणी थेट महापालिका आयुक्तांकडे घेउन येतात. यामुळे दररोज महापालिका आयुक्तालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. आयुक्त दर्जाच्या एकट्या अधिकार्याने प्रत्येक नागरिकांना भेट देण्यात दोघांच्याही वेळेचा बराच अपव्यय होतो. अशातच मंत्र्यांचे दौरे, मुंबईतील बैठका यासाठी आयुक्त बाहेर असल्यास नागरिकांनाही हेलपाटे मारावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आयुक्तांकडे विविध कामांसाठी येणार्या नागरिकांचे म्हणणे, तक्रारी ऐकून घेण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली सर्वच प्रमुख विभागांतील अधिकार्यांचा समावेश असलेला अभ्यांगत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखालील हा कक्ष आयुक्त कार्यालयाकडे विविध विभागांशी संबधित तक्रारी घेउन येणार्या नागरिकांच्या तक्रारीचे निवेदन घेणार,
तक्रारी ऐकून घेणार, या तक्रारी कक्षातच उपस्थित असलेल्या संबधित विभागाच्या अधिकार्यांना सोपविणार आणि संबधित विभागाच्या प्रमुखांनाही कळविणार.
नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा या कक्षाकडून करण्यात येईल.
तक्रार निवारण झाल्याबाबत तक्रारदारांना माहिती देण्याची जबाबदारी या कक्षातील अधिकार्यांवर राहाणार आहे.
अभ्यांगत कक्षाकडे आलेल्या तक्रारी व निवारणाचा अहवाल दर पंधरा दिवसांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत महापालिका आयुक्तांकडे देण्यात येणार आहे.
विशेषत: सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारीवर तातडीने सुनावणी घेउन अतिरिक्त आयुक्त आणि
आयुक्तांच्या निदर्शनास आणाव्यात असेही डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन