Pune PMC News | आदर्श रस्त्यांवर ड्रेनेज लाईनसाठी होणार खोदाई ! महापालिकेच्या पथ आणि अन्य विभागातील असमन्वय उघडकीस

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

पुणे : Pune PMC News | महापालिकेने पहिल्या टप्प्यात पंधरा प्रमुख रस्ते खड्डेमुक्त केले आहेत. या कामाला अवघे काही महिनेच झालेले असताना यापैकी टिळक , बाजीराव आणि शिवाजी रस्ता लवकरच ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदला जाणार आहेत. या कामांच्या निविदेला नुकतेच स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे. ही बाब पथ विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या कामांवर आक्षेप नोंदविल्याने प्रशासनातील असमन्वय उघडकीस आला आहे.

स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये टिळक रस्त्यावर स.प.महाविद्यालय ते दुर्वांकूर हॉटेल, बाजीराव रस्त्यावर शनिपार चौक ते विश्रामबाग वाडा तसेच शिवाजी रस्त्यावरही ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला मान्यता दिली. यापैकी बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यांची नुकतेच काही महिन्यांपुर्वी आदर्श रस्त्यांअंतर्गत दुरूस्ती करण्यात आली आहे. पथ विभागाने १५ आदर्श रस्त्यांवर पुढील तीन वर्षे खोदाईला परवानगी देणार नसल्याचे यापुर्वीच जाहीर केले आहे. परंतू यानंतरही बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावर ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदाई केली जाणार असल्याचे समोर आले आहे.

   यासंदर्भात पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले, की या दोन रस्त्यांवरील ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत पथ विभागाकडे कुठलिही विचारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे आक्षेप नोंदविणार आहोत. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, की यासंदर्भात ड्रेनेज विभागाकडे चौकशी करण्यात येईल. यापुढे ड्रेनेज, पाणी पुरवठा अथवा महापालिकेच्या अन्य विभागांना रस्त्यांवर खोदाई करण्यापुर्वी पथ विभागाच्या परवानगीनंतरच कामाचे नियोजन करण्याबाबत आदेश काढण्यात येतील.

‘तकलादू’ दुरूस्तीबद्दल पथ विभागाचे ड्रेनेज आणि पाणी पुरवठा विभागाला खरमरीत पत्र

ड्रेेनेज विभागाच्यावतीने नुकतेच आपटे रस्त्यावर पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. तर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने शिवाजीनगर येथील लकाकी रस्ता आणि लगतच्या डीएसके शोरूम कडे जाणार्‍या रस्त्यावर पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदाई केलेल्या रस्त्याची दुरूस्तीची जबाबदारी संबधित ड्रेनेज आणि पाणी पुरवठा विभागाकडे आहे. परंतू या तीनही रस्त्यांची दुरूस्ती चुकीची झाली असून रस्त्यावर उंचवटे आणि खोलगट भाग झाल्याने वाहनचालकच नव्हे तर पादचार्‍यांनाही त्याचा त्रास होत आहे. कामाचा दर्जाही सुमार आहे. ही बाब पथ विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी ड्रेनेज आणि पाणी पुरवठा विभागाला खरमरीत पत्र पाठवून रस्त्याची योग्य पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी पत्र दिले आहे.

You may have missed