Pune PMC News | पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत होणार भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

PMC

पुणे: Pune PMC News | पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पीपीएम कोऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायजर, टीबी हेल्थ विजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

यासाठी पात्रता काय असणार आहे?

पीपीएम कोऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणे अपेक्षित आहे. याचसोबत हेल्थ प्रोजेक्टसवर १ वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर पदासाठी बॅचरल डिग्री प्राप्त केलेली असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असावा. याचसोबत त्याला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन काय असणार आहे?

जिल्हा पीपीएम कोऑर्डिनेटर पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर पदासाठीही २०,००० रुपये पगार मिळणार आहे. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी १५,५०० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed