Pune PMC News | पुणे महापालिकेने जादा पाणी वापरले, जलसंपदा विभागाने तब्बल 714 कोटी रुपयांच्या थकबाकीची बजावली नोटीस

Pune PMC

पुणे : Pune PMC News | शहराला दिल्या जाणाऱ्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग व महापालिकेत चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे.आता जादा पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला तब्बल ७१४ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये चालू वर्षाची थकबाकी तब्बल १७४ कोटी रुपये आहे. या थकबाकीपोटी महापालिकेने तातडीने २०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त पाणी वापर केल्यास दंड ठोठावण्यात येतो. मात्र, महापालिकेने २०१६ पासून या नियमबाह्य व मापदंडापेक्षा अतिरिक्त पाणी वापरावर दंडात्मक पाणीपट्टी भरणे बंधनकारक असूनही अद्याप कोणताही दंड जमा केला नाही. तसेच, २००५ पासून गेल्या १९ वर्षांत महापालिका प्रक्रिया केलेले पाणी जलसंपदा विभागास देऊ शकले नाही.

त्यामुळे अतिरिक्त वापराचे ६.५० टीएमसी आणि प्रक्रिया केलेले ६.५० टीएमसी, असे १३ टीएमसी पाणी जलसंपदा विभागाला सिंचनासाठी आवश्यक आहे. महापालिका वार्षिक १३ टीएमसी पाणी प्रदूषण करत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, गेल्या ५ वर्षांत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिकेने दंड भरलेला नाही, असा आरोपही विभागाने केला आहे.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून २१ टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर असताना, जादा पाणी उचलत असल्याने महापालिकेला नोटीस बजवावी, असा आदेश मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा विभागाला दिला होता. त्यानंतर विभागाने महापालिकेला तब्बल ७१४ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली आहे.

या नोटिसीनुसार शहराला खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी ११.५० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. यातील ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून सिंचनासाठी कालव्यामध्ये उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. मात्र, महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत असून, हा वापर साडेपाच ते ८ टीएमसीपर्यंत जादा आहे.

महापालिकेकडे असलेली थकबाकी-

मंजूर पाणी आरक्षणावरील थकित पाणीपट्टी रक्कम : ६१.८७
नियमबाह्य व मापदंडापेक्षा अतिरिक्त पाणीवापरावरील
थकित पाणीपट्टी रक्कम : १११.९८
प्रदूषण मंडळ दंडात्कम रक्कम : ५४०.७५
एकूण थकित पाणीपट्टी रक्कम : ७१४.६०

पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप म्हणाले,
” याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून,
वर्गीकरणातून थकबाकीपोटी काही रक्कम जलसंपदा विभागाला देण्यात येईल.
यासंदर्भात विभागाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे.
त्यातून मार्ग काढण्यात येईल.
महापालिकेने यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.
त्याची पडताळणी सुरु आहे. ” (Pune PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed