Pune PMC News | पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला सलग चौथ्या वर्षी अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न; सरत्या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत 2 हजार 601 कोटींची भर

Pune PMC

पुणे : Pune PMC News | पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने (PMC Building Development) सलग चौथ्या वर्षी अपेक्षित उत्पन्नापेक्षा तब्बल १९० कोटी रुपये अधिक मिळवत दोन हजार ६०१ कोटींचा टप्पा पार केला. सरलेल्या २०२४- २५ या आर्थिक वर्षात दोन हजार ४९२ कोटी रुपये अपेक्षित धरले होते.

महापालिकेला प्रामुख्याने मिळकत कर, बांधकाम विकसन शुल्क आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटी परताव्याचे उत्पन्न मिळते . 2024 – 25 या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेने बांधकाम विभागासाठी दोन हजार 412 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्चला महापालिकेला दोन हजार सहाशे एक कोटी 88 लाख रुपये उत्पन्न मिळाले . अंदाजित उत्पन्न पेक्षा हे उत्पन्न सुमारे 190 कोटी अधिक आहे सन २०२३- २४ मध्ये ही अंदाजपत्रकात एक हजार 604 कोटी 84 लाख उत्पन्न अपेक्षित धरले होते. प्रत्यक्षात दोन हजार 407 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. त्या अगोदरच्या वर्षातही एक हजार 400 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना महापालिकेने एक हजार 635 कोटी रुपयांच्या पर्यंत झेप मारली होती. तर 2021 – 22 मध्ये ही एक हजार 185 कोटी उत्पन्न अपेक्षित असताना दोन हजार 95 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली होती.

बांधकाम विभागाने मागील आर्थिक वर्षात तीन हजार 351 बांधकामांना परवानगी दिली. यातून बांधकाम विभागाला दोन हजार 601 कोटी 88 लाख रुपयांचा महसूल मिळाला.

उत्तम शैक्षणिक संस्था, आयटीसह विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमुळे असलेली उत्तम रोजगारसंधी, आल्हाददायी वातावरण,उत्तम राहणीमान यामुळे पुणे शहराकडे कायमच मोठा ओढा राहिला आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची संख्याही वाढली आहे. बांधकाम विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरमुळे परवाना प्रक्रियाही गतिमान झाली आहे. त्यामुळेच परवान्यांची संख्या व उत्पन्नातही वाढ झाली आहे.

प्रशांत वाघमारे (शहर अभियंता, पुणे महानगरपालिका)
Prashant Waghmare (City Engineer, Pune Municipal Corporation)

You may have missed