Pune PMC News | रामकुमार अग्रवाल यांच्या डमीचा बनावट मृत्यूचा दाखला बनविला ! पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील दोन खाजगी डाटा ऑपरेटर अटकेत

PMC

श्रीवर्धनमधील जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या तपासणीदरम्यान बनावट मृत्यू दाखल्याचे गुपीत उघड

पुणे : Pune PMC News | रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील ४० गुंठे जमीन विक्रीसाठी पुण्यात राहाणार्‍या जागा मालकाचा डमी उभा करून खरेदीखताची नोंदणी केली. विशेष असे की हा नंतर हा डमी मालक मृत झाल्याचा दाखला देखिल पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातून तयार करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रायगड पोलिसांनी (Raigad Police) हा दाखला कसा इश्यू केला याची माहिती विचारल्यानंतर महापालिका यंत्रणा कामाला लागली. चौकशी दरम्यान, धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडील स्वप्नील रमेश निगडे (Swapnil Ramesh Nigde) आणि शुभम संजय पासलकर (Shubham Sanjay Pasalkar) यांनी आर्थिक लोभापायी हा बनावट मृत्यू दाखला (Fake Death Certificate) दिल्याची कबुली दिल्याने या दोघांना रायगड पोलिसांनी अटक केली. (Cheating Fraud Case)

माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांनी (Dighi Sagari Police) नुकतेच धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाला पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये त्यांच्याकडे रामकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल Ramkumar Brahmadutt Agarwal (रा. कॅम्प, पुणे) यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले येथील ४० गुंठे जमीन विक्रीच्या व्यवहारात त्यांची फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी २०१९ ते २०२२ या कालावधीत अग्रवाल यांच्या मालकिची जमीन परस्पर विकताना बनावट व्यक्ति उभा केला. यासाठी त्याची रामकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल या नावाने कागदोपत्री पुरावे देखिल करून खरेदी खत नोंदविण्यात आले.

दरम्यान, रामकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी फसवणूक झाल्यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस तपासादरम्यान संबधित डमी व्यक्ती हा कात्रज येथील संतोषनगरमध्ये राहात असल्याचे व २५ मे २०२१ मध्ये त्याचा राहात्या घरी मरण पावला. परंतू धनकवडी क्षेत्रिय कार्यालयामध्ये त्याच्या मृत्यूची नोंद १२ एप्रिल २०२४ झाल्याचे समोर आले. मृत्यूच्या प्रमाणपत्राबाबत संशय आल्याने रायगड च्या दिघी सागरी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाला पत्र पाठविले. त्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यासाठी आलेल्या अर्जदारांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधारकार्ड, मृत्यूची नोंद करणारे अधिकार्‍याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मृत्यूची नोंद करताना जोडलेला अर्ज व अन्य कागदपत्रांच्या स्थळ प्रती, मृत्यू नोंद करताना भरलेल्या फॉर्मच्या स्थळप्रतिंची माहीती मागविली. परंतू धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून याठिकाणी मृत्यूची नोंद करणारा कर्मचारी, दाखला ऍप्रूव्ह करणारा लिपिक आणि ज्या वैद्यकीय अधिकार्‍याची डिजीटल सही वापरली त्या अधिकार्‍याच्या नाव व अन्य डिटेल्स व्यतिरिक्त इतर कागदपत्र देउ शकली नाही. मागील दोन, तीन दिवसांपासून ही कागदपत्रच आढळत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (Pune PMC News)

दरम्यान, रायगड पोलिसांनी या क्षेत्रिय कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने डेटा एन्ट्री करणार्‍या ऑनलाईन संस्थेत काम करणार्‍या स्वप्नील निगडे आणि शुभम पासलकर या दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आर्थीक लोभापायी रामकुमार अग्रवाल यांच्या मृत्यू दाखल्याची एन्ट्री केल्याचे कबुल केल्याने दोघांना अटक केली. याप्रकरणी मृत्यू दाखला ऍप्रूव्ह करणार्‍या जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी पूनम धरपाळे आणि ज्यांची डिजीटल स्वाक्षरी वापरण्यात आली ते तत्कालीन क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे रायगड पोलिसांच्या पत्रात नमुद करण्यात आले.

कागदपत्रांची माहिती मागविली आहे – डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख

रामकुमार अग्रवाल यांच्या मृत्यूचा दाखला देताना सोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांचा शोध घेत आहोत, परंतू ती आढळून येत नाही. जन्म मृत्यूची नोंदणी केंद्राच्या पोर्टलवर करण्यात येते. त्यामुळे या दाखल्याच्यावेळी कोणती कागदपत्र जोडली आहेत याची माहिती केंद्रीय जन्म मृत्यू नोंदणी मिळावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून जन्म आणि मृत्यूची ऑनलाईन नोंदणी होते व दाखलेही ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातात. दाखले देण्यासाठी महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था आहे. याठिकाणी डाटा एन्ट्रीचे काम हे खाजगी संस्थेला देण्यात आले आहे.

परंतू त्यांनी अपलोड केलेली माहीती आणि त्यासंदर्भातील कागदपत्र तपासणीचे काम हे महापालिकेचा लिपिक दर्जाचा अधीकारी करतो. त्याने कागदपत्रांची माहीती पडताळून अप्रूव्ह केल्यानंतर ओटीपी येतो. तो ओटीपी ऑनलाईन नमूद केल्यानंतर क्षेत्रिय वैद्यकीय अधिकार्‍याची डीजीटल सही होउन दाखला तयार होतो. दाखले देण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍याची डिजीटल सही संबधित क्षेत्रिय कार्यालयात रेकॉर्ड झालेली असते. यासाठी तो उपस्थित असणे बंधनकारक नाही. परंतू त्याने सातत्याने रँडम तपासणी करणे गरजेचे आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबधित डेटा ऑपरेटर्सची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे (Dr Nina Borade) यांनी सांगितले. (Pune PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed