Pune PMC News | मोठ्या बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण पातळी दर्शविणारे ‘सेन्सर्स’ प्रभावी ठरत आहेत; बांधकामांच्या ठिकाणची प्रदूषण पातळी कमी करण्याचा मार्ग सापडला

Pune PMC News | 'Sensors' that show pollution levels at large construction sites are proving effective; A way to reduce pollution levels at construction sites has been found

पुणे : Pune PMC News | बांधकामांच्या ठिकाणी धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम व्यावसायीक आणि महापालिकेने सुरू केलेल्या संयुक्त प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. प्रशासनाने पाच हजार चौ.मीटरपेक्षा अधिकचे बांधकाम असलेल्या साईटस्वर लावण्यात आलेल्या ‘सेन्सर’ मुळे प्रशासनाला डॅश बोर्डवर साईटस्वरील प्रदूषणाची लाईव्ह परिस्थिती बसल्या ठिकाणी पाहाता येत आहे.  पहिल्या टप्प्यात १६१ बांधकाम साईटसवर हे सेन्सर बसविण्यात आले त्याठिकाणची वायू प्रदूषण पातळी अत्यंत कमी असल्याचे डॅशबोर्डवर दिसून आले.

पुणे शहर वेगाने विकसित होत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेेली बांधकामे आणि आरएमसी प्लांटस्मुळे नागरिकांना प्रदूषणाला आणि त्यानिमित्ताने होणार्‍या आरोग्याच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरातील बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी राज्य प्रदूषण मंडळाच्या निर्देशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर आयआयटीएमच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात पाच हजार चौ.फुटांपेक्षा मोठ्या बांधकाम साईटस्वर प्रदूषण मोजणारे सेन्सर बसविण्याचे आदेश दिले आहेत. शहरात सुमारे ६०० हून अधिक ठिकाणी ही बांधकामे सुरू असून त्यापैकी १६१ ठिकाणी आतापर्यंत सेन्सर्स बसविण्यात आले आहे. हे सेन्सर्स महापालिकेच्या डॅशबोर्डवर घेण्यात आले आहेत.

         सेन्सर्समध्ये चार रंगाच्या लाईटस् असून प्रदुषण पातळीनुसार हिरवा, निळा, ऑरेंज आणि लाल रंगाची लाईट लागते. प्रदुषण पातळी कमी असेल तर हिरव्या रंग, त्यापेक्षा अधिक असेल तर पिवळा, त्यापेक्षा अधिक असेल तर ऑरेंज आणि खूपच प्रदुषण असेल तर लाल रंगाची लाईट लागते. बांधकाम साईटस्वर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही या लाईटस् पाहून तातडीच्या उपाययोजना करण्याचा अलर्ट मिळतो.  मुळातच ऑरेंज लाईट लागताच कामाच्या ठिकाणी प्रदुषण कमी करण्यासाठी काळजी घेण्यात येते. आज दुपारी चार वाजता महापालिकेच्या डॅशबोर्डवर ज्या १६१ ठिकाणी सेन्सर्स बसविले आहे, तेथील सेन्सर्स ग्रीन लाईटस् अर्थात प्रदूषण पातळी कमी असल्याचे दर्शवित होते.

सेन्सर्सद्वारे येणार्‍या माहितीतीची डॅशबोर्डवर सातत्याने पाहाणी करण्यात येते. सुदैवाने सेन्सर्स बसविल्यानंतर एखाद , दुसर्‍या ठिकाणचीच परिस्थिती पिवळ्या पातळीपर्यंत गेली होती. संबधित विकसकाला अलर्ट करून माहिती दिल्यानंतर त्यानेही धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली. सेन्सर्समुळे चांगला उपयोग होत असून लवकरच एक हजार चौ.फुटापेक्षा अधिकचे क्षेत्र असलेल्या बांधकाम साईटस्वर देखिल सेन्सर्स बसविण्याबाबत कळविण्यात येईल.  आयआयटीएमने सेन्सर्स उत्पादन करणार्‍या सात आठ कंपन्यांची यादी दिली आहे. त्यांच्याकडून जसजशी उपलब्धता होईल, त्यानुसार सेन्सर्स बसविणण्याबाबत व्यावसायीकांना कळविण्यात येईल. यासंदर्भात क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायीक संघटनेसह सर्वच बांधकाम व्यावसायीक संघटनांना यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

– अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महापालिका .

You may have missed