Pune PMC News | पुणे शहराच्या प्रवेशद्वारांवर व्हीआयपी’ स्वच्छतागृहांची उभारणी होणार ; महापालिकेने 7 ठिकाणांहून मागवले प्रस्ताव

air conditioned VIP toilets

पुणे : Pune PMC News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृह उभारण्याचे आदेश दिले होते. महापालिकेतर्फे पुणे शहराच्या प्रवेशद्वारांच्या परिसरात सात अत्याधुनिक व ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे. सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे- मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशन जवळ अशा सात ठिकाणी ही ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे.

वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहांमध्ये आंघोळीसाठी आवश्यक व्यवस्था, कपडे बदलण्यासाठी खोली आणि प्रसाधनगृह असेल. मोबाइल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा तसेच वायफाय सुविधादेखील असेल. महिला आणि पुरूषांसह तृतीयपंथी देखील त्याचा वापर करू शकतील. दिव्यांगांसाठी तेथे रॅम्प असतील. येथे देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.

उपायुक्त संदीप कदम म्हणाले, ” एका ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहासाठी साधारण ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही स्वच्छतागृह उभारणे आणि त्यांची देखभाल करणे यासाठीच्या विविध पर्यायांसह इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ‘पे अँड यूज’ तत्वावर ही स्वच्छतागृह उपलब्ध होतील. स्वच्छतागृहाची उभारणी आणि देखभाल दुरूस्तीसाठी उत्पन्नाचे पर्याय म्हणून याठिकाणी संबधिताला जाहिरातींचे हक्कही देण्याचा विचार आहे.” (Pune PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed