Pune PMC Water Supply | जलवाहिनी फुटल्याने पुण्यातील ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेकडून नागरिकांना आवाहन

Water Supply

पुणे : Pune PMC Water Supply | शहराला पाणी पुरवठा करणारी ससुन रुग्णालय (Sassoon Hospital) परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीमुळे या परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारी (दि.१६) हाती घेतले जाणार आहे. यामुळे पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि १७) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यातील पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार असल्याचे पालिकेने म्हंटले आहे. त्यामुळे रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune PMC Water Supply)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed