Pune PMC Water Supply | पुणे : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : Pune PMC Water Supply | महापालिकेकडून तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी (दि. ३ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
या भागांना होणार परिणाम:
नवीन पर्वती आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी), खडकवासला जॅकवेल, वारजे फेज १ व २, एस.एन.डी.टी., गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, चतु:श्रुंगी टाकी परिसर, कोंढवे-धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर केंद्रे इत्यादी.
पाणीपुरवठा बंद का?
गर्मीमध्ये पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे अचानक पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता टाळण्यासाठी विद्युत व पंपिंग यंत्रणेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामे एकाच दिवशी केली जाणार आहेत.