Pune PMPML Bus | पुणे: PMPML च्या चालकांवर होणार कठोर कारवाई ! कामकाजाच्या वेळेत मोबाईलचा वापर तसेच तंबाखू सेवन केल्यास निलंबन; तक्रारींसाठी व्हाट्सॲप क्रमांक जारी

pmpml-bus

पुणे : Pune PMPML Bus | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या एका चालकाला बस चालवताना आयपीएलचा सामना पाहिल्यामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळेत कोणत्याही प्रकारची असंवेदनशील किंवा निष्काळजी वर्तणूक दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते, अशाप्रकारचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

यापूर्वीही पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल परिपत्रकात म्हटले होते.

सध्या पीएमपीएमएलकडे ९ हजार ४०० चालक कर्मचारी आहेत. ज्यामध्ये ४ हजार ४०० कंत्राटी चालकांचा समावेश आहे. आता पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सॲप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी तक्रारींचे फोटो/व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ पीएमपीएमएलच्या ईमेल complaints@pmpml.org, व्हॉट्सॲप क्रमांक ९८८१४९५५८९ वर पाठवण्याची विनंती केली आहे किंवा पीएमपीएमएलच्या जवळच्या डेपोमध्येही पुराव्यासह तक्रारी करता येणार आहेत.

You may have missed