Pune PMPML News | पीएमपीएमएलचा तोटा कमी करण्यासाठी तिकीट दरात वाढीच्या हालचाली
पुणे – पीएमपीएमएलचा (Pune PMPML News) तोटा ७५० कोटी रुपयांच्यावर गेला असून कर्मचार्यांना नोकरीत कायम स्वरुपी केल्याने वेतनावरील खर्च वाढला आहे. पीएमपीएमएलला आर्थिक बळ देण्यासाठी तिकीट दरवाढ (PMPML Ticket Price Increase) करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची बाब समोर आली आहे.
पुणे शहराची जीवनवाहीनी म्हणून पीएमपीएमएल मागील अनेक दशके सेवा बजावत आहे. पीएमटी (Pune PMT) आणि पीसीएमएमटीचे विलिनीकरण होउन पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी स्थापन झाल्यानंतर ही सेवा केवळ दोनच महापालिकांच्या हद्दीत सिमित न राहाता जिल्ह्यातील अनेक महत्वांच्या गावांपर्यंत पोहोचली असून सर्वसामान्यांसाठी महत्वाची ठरली आहे. परंतू वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळत असल्याने पीएमपीएमएलचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला असून चालू आर्थिक वर्षात तो ७५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तोटा वाढत असताना खर्चही वाढत आहे. कर्मचार्यांना सातवा आयोगानुसार वेतन, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कायम सेवेत घेतल्याने वेतनावरील वाढलेला खर्च, इंधन खर्चातील वाढ यामुळे संचलन तोटा वाढत आहे. अशातच प्रशासनाने मागील आठ वर्षांमध्ये पीएमपीएमएलच्या तिकीट दरात वाढ केली नाही. अन्य मार्गाने उत्पन्न वाढविण्यावर देखिल मर्यादा आहेत. यामुळेही तोट्याचे प्रमाण वाढत असून ही संचलनातील तूट पुणे (Pune PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) ६०:४० या प्रमाणात भरून देत आहे. यामुळे दोन्ही महापालिकांवरील दायित्व देखिल वाढत आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीएम धावत असल्याने संचलनातील तूट या संस्थेनेही देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
मात्र, पीएमआरडीएच्यावतीने शासनानेच एकदा १८७ कोटी रुपये पीएमपीएमएलला दिले आहेत.
त्यांच्याकडून रक्कम मिळत नसल्याने पीएमपीएमएलची अडचण वाढत चालली आहे.
यावर पर्याय म्हणून पीएमपीएमएल प्रशासनाच्यावतीने तिकीट दरात वाढ करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. (Pune PMPML News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा