Pune Police MCOCA Action | पुणे : टँकरमधून पेट्रोल चोरीचे गुन्हे करणार्‍या प्रविण मडीखांबे टोळीवर मोका कारवाई; १७ वर्ष सातत्याने करीत आहेत टँकरमधून पेट्रोल, डिझेल चोरी

MCOCA

पुणे : Pune Police MCOCA Action | लोणी (Loni Kalbhor) येथून पेट्रोल, डिझेलचे टँकर वाटेत थांबवून त्यांच्यातून पेट्रोल, डिझेलची चोरी करणार्‍या प्रविण मडीखांबे यांच्यासह १२ जणांवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar) यांनी मोक्का कारवाई केली आहे.

https://www.instagram.com/p/DAP-13RCnoZ

शुभम सुशील भगत (वय २३, रा. बोरकार वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१, रा. थेऊर फाटा, ता. हवेली), रवी छोटेलाल केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (वय ३०, रा. वाणीमळा, थेऊर फाटा, ता. हवेली), कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१, रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली), रोहितकुमार छेददुलाल (वय २५, रा. बोरकरवती, माळीमळा, ता. हवेली), अभिमान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५, रा. पांढरी रोड, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२, रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (वय २४, रा. हनुमाननगर, कोथरुड), तेजस तुकाराम वाघमारे (वय २३, रा. न्यू शांतीनगर, श्रावणधारा, कोथरुड) यांना अटक केली आहे. टँकर चालक आणि टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली) हे फरार आहेत.

https://www.instagram.com/p/DAP6t1Jify8

लोणी काळभोरमधील एच पी सी एल व आय ओ सील एल कंपनीमधून टँकर बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येऊ नये, या करीता टँकरला कंपनीचे लोक लॉक करुन बाहेर पाठविले जाते. असे असताना कुंजीरवाडी येथील तुकाराम धुमाळ यांचे घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये टँकर घेऊन जाऊन त्यामधून पेट्रोल डिझेल बॅरेलमध्ये काढत असल्याची बातमी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर (API Raju Manohar) व पोलीस अंमलदार ढमढेरे यांना १० सप्टेबर रोजी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ३ टँकरमधून इलेक्ट्रिकल मोटारीच्या सहाय्याने डिझेल बॅरंलमध्ये काढत असताना मिळून आले. या कारवाईत १६२० लिटर डिझेल जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात पोलिसांनी १० जणांना अटक केली. या टोळीचा टोळीप्रमुख प्रविण मडीखांबे (Pravin Madikhambe) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. गेल्या १७ वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले असल्याचे दिसून आले.

https://www.instagram.com/p/DAQEc8BpfKZ

त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्या मार्फत तो अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) यांच्याकडे सादर केला. या प्रकरणाची छाननी करुन मनोज पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

https://www.instagram.com/p/DAQF6zBJCN8

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट (PI Rajendra Karankot), मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके (PSI Amol Ghodke), पोलीस अंमलदार रामहरी वणवे, मंगेश नानापूरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव वीर, योगेश पाटील या पथकाने केली आहे.

https://www.instagram.com/p/DAQHtZtCkgr/?img_index=1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Dhangar Reservation GR | “…तर राज्यातील 60-65 आमदार राजीनामा देतील”; महायुतीतल्या नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवारांच्या ६ आमदारांबाबत शरद पवारांचे प्लॅनिंग; राजकीय सामना रंगणार

Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर आयोजित महिला मेळाव्याला 4 हजार भगिनींची उपस्थिती; सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरले (Video)

You may have missed