Pune Police MPDA Action | नाना पेठेत दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगार अमन इब्राहिम खान याच्यावर MPDA अन्वये कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
पुणे : Pune Police MPDA Action | नाना पेठ परिसरात शस्त्र बाळगून दहशत माजवून खंडणी उकळणे, मारामार्या करणार्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पीडी ए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले आहे.
अमन इब्राहिम खान Aman Ibrahim Khan (वय २३, रा. सत्तार खान चाळ, नाना पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या परिसरातील ६ सराईत गुन्हेगारांना यावर्षी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अमन खान याच्यावर शस्त्र बाळगणे, खंडणी उकळणे, मारामार्या करणे, असे ४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ईद निमित्त गोव्याला जाण्यासाठी दुकानदारांना धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी अमन खानसह चौघांना समर्थ पोलिसांनी २ वर्षांपूर्वी अटक केली होती. त्याची दहशत असल्याने नागरिक उघडपणे तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी एमपीडीए अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत पोलीस आयुक्तांनी त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. समर्थ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस हवालदार प्रसाद दोड्यानूर, जोरकर, बेडदूर यांनी केली आहे.
