Pune Police New Police Stations | पुणे पोलिस आयुक्तालयात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन 7 पोलिस ठाणे सुरू होणार; 60 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद, दसऱ्याच्या मुहूर्तावर कामकाजास सुरुवात
पुणे : Pune Police New Police Stations | शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने शहरात सात नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सात पोलीस ठाण्यांचा श्रीगणेशा होणार आहे.
https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr
नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे कामकाजाची विभागणी होईल, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाण्यातील कामकाजासाठी ८१६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आठवडाभरात या कामाची सुरुवात होईल अशी माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk
पुणे पोलिस आयुक्तालयात आंबेगाव (Ambegaon Police Station), नांदेड सिटी (Nanded City Police Station), बाणेर (Baner Police Station), खराडी (Kharadi Police Station), वाघोली (Wagholi Police Station), काळेपडळ (Kalepadal Police Station) आणि फुरसुंगी (Fursungi Police Station) ही नवीन पोलिस ठाणे सुरू होणार आहेत. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नव्याने पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. (Pune Police New Police Stations)
https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ
पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध झालेला निधी
खराडी पोलीस ठाणे : ७ कोटी ५० लाख
फुरसुंगी पोलीस ठाणे : ८ कोटी ८१ लाख
नांदेड सिटी पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख
वाघोली ठाणे : ८ कोटी ७५ लाख
बाणेर पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख
आंबेगाव पोलीस ठाणे: ७ कोटी ९ लाख
काळेपडळ पोलीस ठाणे : १० कोटी २४ लाख
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)