Pune Police News | दारू पिऊन वाहन चालवल्यास आता ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द? पुणे पोलिसांचा मोठा निर्णय
पुणे : Pune Police News | पुण्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास आता ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कारवाई किंवा दंड करून देखील अपघातांमध्ये घट झालेली नाही. लोक दारू पिऊन गाडी चालवतच आहेत. याची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेण्याचे ठरवलं आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्यास थेट लायसेन्स रद्द करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयाला प्रस्ताव पाठवला आहे. पोलिसांचा हा प्रस्ताव न्यायालयात मान्य होतो का? हे पाहावं लागेल. पुण्यात भीषण अपघात झाले ते दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडले आहेत. (Pune Police News)
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात आणि मागील दोन दिवसात पुणे-मुंबई महामार्गावर एकाने मद्यधुंद अवस्थेत गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना उडवले होते.
या सर्व घटनांमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना मद्यधुंद चालकाने उडवले होते.
अपघात झाल्यानंतर आरोपी घरी जाऊन निवांत झोपला होता.
त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध पोलीस कठोर कारवाईच्या भूमिकेत आहेत.
दारू पिऊन गाडी चालवल्यास पहिल्यांदा १० हजार रुपये दंड भरावा लागतो.
दुसऱ्या वेळेस असा गुन्हा घडल्यास २० हजार रुपये दंड आहे. काही प्रकरणामध्ये तुरुंगवास देखील होऊ शकतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?