Pune Police News | पोलिसांनी असभ्य वर्तन केल्याचा पत्रकाराचा आरोप; सेनापती बापट रोडवर मध्यरात्री घडला प्रसंग, वाचा नेमकं काय घडलं
वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले – ‘रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्यांना विचारणा करणे, हे पोलिसांचे कामच आहे. ते त्यांची ड्युटी करीत होते’
पुणे : Pune Police News | पॅव्हेलियन मॉलमध्ये चित्रपट पाहून बाहेर कॅबची वाट पहात असताना पेट्रोलिंग करत आलेल्या दोन पोलिसांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा दावा पत्रकार प्रथमेश पाटील यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्यांना विचारणा करणे, हे पोलिसांचे कामच आहे. ते त्यांची ड्युटी करीत होते, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.(Pune Police News)
हा प्रकार सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉलसमोर २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. प्रथमेश पाटील यांनी याबाबत Social Media वर पोस्ट करुन पुणे पोलिसांची पत्रकार आणि महिलांविषयी ही समज आहे का? असे म्हटले आहे.
या पोस्टमध्ये प्रथमेश पाटील म्हणतात की, पॅव्हेलियन मॉलसमोर मी आणि दोन सहकारी मैत्रिणी एक सिनेमा पाहून ओला कॅबसाठी थांबलेलो असताना पेट्रोलिंग वरचे दोन कॉन्स्टेबल आमच्याकडे आले. आल्याबरोबर थेट इथं काय करत आहात असं किळसवाण्या पद्धतीने विचारलं. आम्ही सांगितल की कॅबसाठी थांबलेलो आहोत.
मग यानं विचारलं मग इथं एवढ्या रात्री काय करता होता? माझा संताप होत होता तरी मी शक्य तितक्या शांतपणे विचारलं, त्याच्याशी काय संबंध? कॅबसाठी थांबलो आहे, बस. काय रे जास्त शहाणा बनतोय का? हा अगदी घिसापिटा प्रश्न आलाच
साहेब आम्ही पत्रकार आहोत, उगाच त्रास देऊ नका, असे परुळेकर राग आवरत सांगत होते. त्यावर तू पत्रकार आहेस तर मग काय ? तू गपचूप विचारतोय ते सांगितले असतं तर नीट सोडलं असतं, जास्त बोलू नको नाही तर रात्र खराब जाईल तुझी, तुला कळणार नाही तो नीट धमकी देण्याच्या सुरात त्यांच्याशी बोलला. त्यावर परुळेकर यांनी आवाज चढवून विचारले, की तुम्ही आम्हाला धमकी का देताय?
धमकी नाही तुम्हा लोकांना गुंड आले असते तर कळलं असतं, चार गुंड आले असते तर कळलं असतं, आमच्याकडेच आला असता मग. त्यांना शांत करुन त्यांची पत्रकार सहकारी त्याच्याशी बोलू लागली तर तो तिला म्हणाला, तुम्ही सगळेच पत्रकार आहात होय?. तुमच्यामुळेच देश बरबाद झालाय. तुम्ही दिवस रात्र काहीही लिहित बसता़. तुम्ही पत्रकारच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, अति शहाणपण करायचा असतो, तुम्हाला. त्यावर परुळेकर यांनी म्हटलं माझं काही चुकलं असेल तर चला चौकीला करा कारवाई. असं म्हटल्यावर तणतणत आणि रागाने गाडी जवळून नेत ते दोन कॉन्स्टेबल पळून गेले, असे परुळेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर त्यांनी माझा पुणे पोलिसांना प्रश्न
१. रस्त्यावर उभ्या असणार्या सामान्य नागरिकाला अशाप्रकारे धमकावणं, विचारणा करण्याच्या नावाखाली घाणेरड्या शक्यतांकडे बोट करणं, हे अधिकृत धोरण आहे काय?
२. रात्री रस्त्यावर उभी प्रत्येक महिला ही तुमच्या अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाणं हे साधारण आहे काय?
३. पत्रकारांनी देशाची वाट लावली, हे तुमच्या वदीर्तील व्यक्तीचं म्हणणं तुमचं अधिकृत पत्रकार धोरण मानावं काय?
४. पोलीस जर स्वत:च्या वाईट वागणुकीसाठी गुंडांची धमकी देत असतील, तर ते स्वत:ची तुलना गुंडांशी करत आहे असं वाटत नाही काय? कारण गुंड कसे वागतील हे अपेक्षित आहे, पण पोलीस असे वागतील हे अपेक्षित नाही.
५. पत्रकार होतो म्हणून आम्हाला किमान मारहाण झाली नाही, पण निरपराध असलेल्या कित्येक सामान्य नागरिकांना अशाप्रकारे पोलीस दलातील निवडक, पण मोठ्या संख्येनं असलेल्या कर्मचार्याच्या जाचाला सामोरे जावं लागनं हे योग्य आहे काय?
६. आम्हाला तुमच्या असण्याने सुरक्षित वाटायला हवं की भीती वाटावी, काय अपेक्षित आहे?
याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshrungi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, राजू परुळेकर यांनी काय पोस्ट केली, याची माहिती नाही. रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्यांना विचारणा करणे, हे पोलिसांचे कामच आहे. ते त्यांची ड्युटी करीत होते.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद