Pune Police News | ‘खाकी’ला आव्हान नको ! पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा, म्हणाले – पोलिसांची ‘ईट का जबाब पत्थरसे’ देण्याची तयारी सुरु
पुणे : Pune Police News | पुणे शहरातील गुंडगिरीने डोके वर काढले असून संपूर्ण शहरालाच वेठीस धरण्याचा प्रकार माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणात दिसून आला. एकप्रकारे ‘खाकी’ लाच आव्हान देण्याचा प्रयत्न या निर्घुण खूनातून गुंडांनी केला (Crime In Pune). त्यामुळे या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी गुंडांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार आहे. गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना ‘ईट का जबाब पत्थरसे’ धोरण पोलिसांकडून अवलंबिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गणेशोत्सवा (Pune Ganeshotsav ) दरम्यान शहर पोलिसांनी बंदोबस्ताची केलेली आखणीची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी गुंडांच्या बाबतीत पोलिसांची भूमिका यापुढे आणखी कडक राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याचा खून कौटुंबिक, संपत्ती तसेच वैमनस्यातून झाला आहे. कट रचून पूर्वनियोजन करुन आंदेकर याचा खून करण्यात आला आहे. खून प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणार्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये कारवाई करुन संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
आरोपींना सज्ञान ठरविणार
वनराज आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. यामध्ये तिघा अल्पवयीनांचा समावेश आहे. या गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहून या अल्पवयीनांविरुद्ध सज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई करता यावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
शहरात ७५० गुंडांची यादी
मोक्का, एमपीडीए, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करणार्या गुन्हेगारांची यादी पोलिसांनी केली आहे. त्यात गंभीर गुन्हे असलेल्या ७५० गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांच्याकडून यापुढे गुन्हा घडल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
सोशल मीडियाद्वारे दहशत
पोलीस आयुक्तांनी पुण्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व गुंडाची परेड घेऊन त्यांना इशारा दिला होता.
त्यानंतरही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गजानन मारणे (Gaja Marne), निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal)
यांच्या साथीदारांच्या दहशत माजविणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते.
या गुंडांना समज देऊनही ते त्यांना समजणार नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,
असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी