Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला ! रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
पुणे : Pune Police News | भारती विद्यापीठ परिसरातून राहते घरातून रागाच्या भरात निघून गेलेला १४ वर्षांचा अल्पवयीन मुलाचा चार महिन्यांनंतर शोध लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. हा मुलगा जबलपूर रेल्वे स्टेशनवर पाण्याच्या बाटल्या विकत असल्याचे आढळून आले. स्वारगेट तपास पथकाचे सह प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yevale) यांना त्याची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (Sr PI Dashrath Patil) यांना कळवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या मुलाला ताब्यात घेण्यास आले आहे. स्वारगेट तपास पथकाची (Swargate Police Station) टीम तातडीने जबलपूरला गेले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. (Pune Police News)
याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा १४ वर्षाचा मुलगा वडिलावर रागातून घरातून निघून गेला होता. गेले चार महिने त्याचा शोध घेतला जात होता. स्वारगेट तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले व त्यांच्या सहकार्यांनी अनेक राज्यात मुलांचा यापूर्वी शोध घेतला असल्याने त्यांनाही या मुलाचा शोध घेण्यास सांगण्यात आले होते. या मुलाचा फोटो अन्य राज्यातील पोलिसांना पाठवून शोधण्याचे आवाहन केले होते. त्यातूनच जबलपूर रेल्वे स्टेशनवर (Jabalpur Railway Station) तेथील पोलिसांना हा मुलगा आढळून आला. त्यांनी येवले यांना ही माहिती सांगितली. या उल्लेनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagyani) यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार फिरोज शेख, हर्षल शिंदे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश