Pune Police News | पुणे: पोर्शे अपघातप्रकरणी चार पोलिसांवर कारवाई; DGP रश्मी शुक्ला यांचा आदेश
पुणे : Pune Police News | बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात गंभीर निष्काळजीपणा आणि प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी चार पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक राहुल मुरलीधर जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ महादेव तोडकरी यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
प्रकरणात निष्काळजीपणा, चुकीची दस्तऐवज प्रक्रिया आणि संभ्रम निर्माण करणारी कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपांमुळे ही कठोर कारवाई झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी महासंचालक कार्यालयात अपील केले होते; मात्र, तेथेही बडतर्फीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. पोलिस शिपाई आनंद दिनकर भोसले आणि अमित तानाजी शिंदे यांना पाच वर्षे मूळ वेतनावरच ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा आदेश मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत संबंधितांना शासनाकडे (गृह विभाग) अपील करण्याची मुभा असेल.
