Pune Police News | पुणे: खडक पोलिसांकडून गुटख्याचा साठा जप्त : दोन टेम्पोसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Khadak Police News

पुणे : Khadak Police News | अवैधपणे गुटखा वाहतूक (Illegal Transportation Of Gutka) करणाऱ्या दोन पॅगो टेम्पोवर खडक पोलिसांनी कारवाई करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.13) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लोहीयानगर भागातील (Lohiya Nagar) विराणी स्टील गल्लीमधील सोनमार्ग थिएटर (Sonmarg Theatre Pune) समोर करण्यात आली.

अकिब शकील शेख (वय-32 रा. ए.पी. लोहीयानगर, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3(5) अन्न सुरक्षा मानके 30(2)(अ), 31(1), 26(2) (I), 26(2) (IV) प्रोहिबिशन अँन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार हर्षल चंद्रकांत दुडम (वय-42) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी रात्री हद्दीत पेट्रोलींग करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना माहिती मिळाली की, सोनमार्ग थीएटर समोर दोन टेम्पोमध्ये अवैध गुटखा आहे. त्यानुसार तपास पथकाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पथक लोहीयानगर येथे गेले असता सोनमार्ग थिएटरसमोर दोन पॅगो टेम्पो उभारल्याचे दिसून आले. आरोपी त्यामध्ये गुटखा ठेवून लॉक करताना दिसून आला. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 6 लाख 17 हजार 700 रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा), रोख रक्कम, चार लाख 1 हजार 500 रुपयांचे दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद डेंगळे करीत आहेत

ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे,
पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन ढावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, आशिष चव्हाण,
इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांच्या पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed