Pune Police News | गणेशोत्सवात छेडछाड करणाऱ्यांची काढली जाणार धिंड; छायाचित्रही भर चौकात लावणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

Pune Police On Road Romeos

पुणे : Pune Police News | गणेशोत्सवाला (दि.७) पासून सुरुवात होत आहे (Pune Ganeshotsav). वैभवशाली परंपरा असणाऱ्या पुण्यात देशातील वेगवेगळ्या भागातून लोक येतात. दरम्यान शहरात मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. मात्र आता छेड काढणाऱ्यांवर त्वरित कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी दिले आहेत. (Action On Road Romeos)

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांचे दागिने चोरणे, तसेच मोबाईल संच चोरीचे (Mobile Theft Cases) गुन्हे रोखण्यासाठी मध्यभागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे (Police Bandobast) . छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र भर चौकात लावणार आहेत. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

महिला पोलिसांची पथके, तसेच दामिनी पथक गर्दीत गस्त घालणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मध्यभागात गस्त घालणार आहेत. गर्दीत महिलांची छेड काढणारा, तसेच अश्लील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्र काढण्यात येणार आहे.

छेड काढणाऱ्याचे नाव, पत्ता, छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहेत.
अशा प्रकारचे पोलिसांकडून फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत.
रोड रोमिओची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येणार आहे. (Pune Police News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed