Pune Police News | पुणे पोलिसांना झाले तरी काय? एकीकडे मारहाण झालेल्या पोलिसास फिर्याद न देण्यासाठी घातली गळ तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणेच्या टोळीतील गुंडांची नावे समजू नये यासाठी आटापिटा; प्रत्येक वेळी पोलीस आयुक्तांनी खरडपट्टी काढल्यावर कामे करणार का?

pune police logo

पुणे : Pune Police News | या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे पुणे पोलिसांना नेमके काय झाले आहे, असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे. एका बाजूला एका पोलिसास गुंड बेदम मारहाण करतात, ज्याला मारहाण झाली आहे तो पोलीस स्वत: सीसीटीव्ही पुरवितो, त्या सीसीटीव्हीमधून मारहाणीचे भयानक चित्र दिसत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या पोलिसाला प्रकरण मिटविण्याचा सल्ला देऊन गुन्हा दाखल करु नये, म्हणून गळ घालतो. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भर चौकात भर दुपारी मारहाण होते. पोलीस गुन्हा तर दाखल करतात. पण, गजा मारणेच्या गुंडाची नावे मीडियामध्ये येणार नाही, यासाठी धडपड करताना दिसतात. त्यामुळे पुण्यात पोलिसांचे नेमके काय चालले आहे. जर पोलिसांवरच अन्याय होत असेल, तर आपला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पोलिसाला बेदम मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरडपट्टी केल्यानंतर तीन दिवसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांना दाखल करुन आरोपींना नाईलाजाने अटक करावी लागली. हे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी कोथरुडमध्ये IT इंजिनिअरला भर दुपारी शेकडो लोकांच्या समोर बेदम मारहाण झाली. हा प्रकार कोथरुडमधील तसेच शहरातील सर्व महत्वांच्या भाजपच्या पदाधिकार्‍यांपर्यंत पोहचला. त्यामुळे कोथरुड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा तर दाखल करुन घेतला. पण मारहाण करणारे हे गजा मारणे यांच्या टोळीतील आहेत, हे लक्षात आल्यावर पोलिसांची धावपळ सुरु झाली. ही माहिती मीडियापर्यंत पोहचल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांना पत्रकारांचे फोन सुरु झाले. परंतु, कोथरुडमधील पोलीस अधिकारी पत्रकारांना टाळाटाळ करु लागले.

मी घटनास्थळाला भेट दिली. पण नंतर काय कारवाई झाली हे समजले नाही. माझी आज सुट्टी आहे, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले तर, तपास अधिकारी म्हणाले, काल रात्री माझी नाईट असल्याने कोणाला पकडले, याची मला माहिती नाही़ अशी उत्तरे देऊन टाळाटाळ करु लागले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांचे तर संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे, हे पालुपद दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरु होते, त्यानंतर शुक्रवारी सकाळीही कोणा कोणाला अटक केली. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का अशी चौकशी केल्यावर त्यांनी नावे सांगायचे तर टाळलेच, पण मी माहिती घेऊन कळवितो, असे सांगून पुन्हा टाळाटाळ केली. त्यामुळे गजा मारणे याच्या टोळीने एका आय टी इंजिनिअरला मारहाण केली. ते लपविण्यासाठी पोलिस का धडपड करत आहेत. आरोपींना अटक केली तर त्यांची नावे सांगण्यास काय टाळाटाळ केली जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे, केंद्रीय राज्यमंत्री यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण होते, तरी पोलीस गुंडाच्या टोळीची नावे समोर येऊ नये, यासाठी धडपड करण्यामागचे कारण काय? की पोलीस आयुक्त यांनी सांगितल्यावरच कारवाई होणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed