Pune Police-Punit Balan Group (PBG) | संगीतकार अजय – अतुलने केले पोलिस कुटुंबियांना मंत्रमुग्ध

Ajay-Atul

पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुपच्यावतीने आयोजित ‘तरंग’ कार्यक्रम जल्लोषात संपन्न

पुणे : Pune Police-Punit Balan Group (PBG) | संगीतकार अजय – अतुल (Ajay Atul) यांच्या जोडीने एकापेक्षा एक बहादार मराठी- हिंदी गाणी सादर करत पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना अक्षरश मंत्रमुग्ध करून टाकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह हिंदी- मराठी सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती, 70 हून अधिक संगीत गायक आणि वाद्यक,  फटाक्याची मोहक अतिषबाजी, उपस्थितांनी गाण्यांवर दरलेला ठेका यामुळे पहिल्याच ‘तरंग’ कार्यक्रमाने पोलिसांची मने जिंकली.

पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना कुटुंबियासोबत उत्सव साजरा करता यावा यासाठी पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पोलिस कुंटुंबियासांठी गायक व संगीतकार अजय- अतुल यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), सहआयुक्त  रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) यांच्यासह अनेक राजकिय नेते मं़डळी, कलाकार उपस्थित होते.

शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंड झालेल्या या ‘तरंग’ कार्यक्रमाची सुरवात शर्वरी जेमनीस यांच्या गणेश वंदननेनी झाली. अभिनेत्री मेघना एरंडे यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमातील आवाज काढून उपस्थित बाल-चमुंची मने जिंकली. त्यानंतर अजय- अतुल यांच्या प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला सुरवात झाली. नटरंग, मल्हारवारी, वाट देसु देघा देवा, मलहिसमा चॉद हे तु.., आई गोंधळाला ये.. सैराटमधील याड लागल ग याड लागल.., भलतच झालय आज.., चंद्रा.., फॅन्ड्रीमधील जीव झाला वेडा पिसा, डॉल्बी वाल्या बोलवाओ माझ्या डिजेला अशी मराठी- हिंदी एकापेक्षा एक सरस गाणी अजय-अतुल यांनी आणि त्यांच्यासह कलाकारांनी सादर करून उपस्थितांना अक्षरश वेड लावले.. सैराटमधील झिंग झिंग झिंग़ांट या गाण्याने तर उपस्थितांनी तर अक्षरश मैदान डोक्यावर घेतले. देवा श्री गणेशा या गाण्याने संगीत मोहत्सवाची सांगता झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना दाद दिली. यावेळी फटाक्यांच्या अतिशबाजी आणि विदयुत रोषणाईने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिसांना सन्मान

‘तरंग’ (Tarang 2025) कार्यक्रमात शहर पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचाही फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एक सराफ पेढीतून चोरलेले तब्बल 17 तोळे सोने पुणे पोलिसांनी परत मिळवून न्यायालयीन प्रक्रिया करून अवघ्या तीन महिन्याच्या आत परत मिळविले. या कार्यक्रमातच ते सराफाला परत करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरंग’ कार्यक्रमाचे कौतुक करताना पोलिसांना चांगल्या वातावरणात जगता आले तर ते चांगले काम करू शकतील. पोलिसांच्या कुंटुंब कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यात येत असून त्यांच्या आरोग्य सुविधा व घरांचा प्रश्न निकाली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी तरंग 2025 कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

पुनीत बालन यांच्या विशेष सत्कार

पुणे पोलिसांच्या कुटुंबियांसाठी पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून ‘तरंग’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्याने पुणे पोलिसांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनीत बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हिंदी-मराठी सिने कलाकार, खेळांडुची हजेरी

अभिनेता बोमन इराणी, नागराज मंजुळे, अजिक्य देव,सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, पुजा चोप्रा, स्मिता गोंदकर, दिप्ती देवी, पुष्कर जोग, मेघा धाडे, तन्मय जका, केदार जाधव, राहुल त्रिपाटी, ऋतुजा भोसले, प्रीत झांगीयाणी, माध्यव अभ्यंकर असे दिंग्गज मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षभरात लोकसभा – विधान सभा निवडणूक असो की अन्य कायदा व्यवस्था अथवा गुन्हेगारीला आळा घालणे असो ही परिस्थिती अत्यंत मेहनतीने आणि यशस्वीरित्या हाताळले आहे. पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.  त्यांच्या मनोरंजनसाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी अजय- अतुल यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 – अमितेश कुमार (पुणे पोलीस आयुक्त)

समाजातील विविध घटकांसाठी नेहमची काम करत असतो. मात्र आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जे नेहमची तत्पर असतात त्यांना कुटुंबियासमवेत ना उत्सव साजरा करत येत ना कुठे निवांत वेळ घालविता येत नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबियासाठी आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा हा विचार मांडला. मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यास तत्काळ होकार दिला. हा तरंग कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः खुप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मला दिले याबद्दल मी पुणे पोलिसांचा आभारी आहे.
             

  • पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed