Pune Police Seized Gold Tempo | पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने जप्त; टेम्पोत सोनं कुठून आलं,कुठं निघालं; डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे: Pune Police Seized Gold Tempo | विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे थोडे दिवस बाकी असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज (दि.२५) पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
https://www.instagram.com/p/DBio1OOC-Dt
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवण्यात आला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/DBiyn_qJcWS
डीसीपी स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS) म्हणाल्या, ” पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व चोवीस तास तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये, पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. (Pune Police Nakabandi)
त्यामध्ये दागिने असून ते मुंबईतून पुण्याच्या कार्यालयात आणले गेले आहेत.
त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण