Pune Police Tadipari Action | वाघोली परिसरात दहशत माजविणार्‍या रेकॉर्डवरील टोळीतील 4 गुन्हेगार 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

Tadipar-pune Police

पुणे : Pune Police Tadipari Action | वाघोली परिसरात सोशल मीडियाचा वापर करुन दहशत माजविणारे, कोयत्याने तोडफोड करुन दहशत निर्माण करणार्‍या चौघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. (Pune Crime News)

रोहन ऊर्फ मोन्या रामप्यारे गिरी (वय २०, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली), विकास राजू जाधव (वय २०, रा. केसनंद फाटा, वाघोली), आदित्य दीपक कांबळे (वय १८, रा. सिद्धी विनायक पार्क, वाघोली), वैभव सुभाष पोळ (वय १८, रा. बी जी एस फाट्याचे जवळ, वाघोली) अशी या तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

पुणे -अहिल्यानगर रोड, वाघोली, बकोरी फाटा, वाघोली बाजारतळ, तसेच आसपासच्या भागात दहशत माजवणे, गंभीर दुखापत करुन तोडफोड करणे असे गुन्हे केले आहेत. लोकांना कायम दहशतीखाली ठेवून त्यांना वारंवार त्रास देणार्‍या गुन्हेगारांमुळे या परिसरातील रहिवासी कायम दडपणाखाली वावरत होते. सराईत गुन्हेगारांवर वचक बसावा, या उद्देशाने सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे यांनी यांनी या सराईत टोळीप्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना प्रस्ताव पाठविला होता. हिंमत जाधव यांनी या सराईत टोळीला पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले आहे.

सोशल मीडियाचा वापर करुन दहशत निर्माण करणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवून अशा प्रकारच्या कारवाईच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड,पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पीर. पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे, प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, महादेव कुंभार, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे, समीर बोरडे यांनी केली आहे. (Pune Police Tadipari Action)