Pune Politics News | भाजपचे श्रीनाथ भिमाले आणि दिलीप कांबळे यांच्या उमेदवारीला ब्रेक?

भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार मंडळ तर कांबळे यांची लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती ! भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची देखिल राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पुणे : Pune Politics News | पर्वती विधानसभा मतदारसंघातून (Parvati Assembly Constituency) यंदा ‘विधानसभेत’ जाण्यासाठी जोरदार तयारी करणारे भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांच्या आकांक्षांना ब्रेक लागल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी कॅन्टोंन्मेट मतदारसंघातून (Pune Cantonment Assembly Constituency) पुन्हा एकदा माजी मंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble) यांच्या उमेदवारीवरही फुली बसल्याचे समोर येत आहे. राज्य शासनाने आचारसंहितेपुर्वी या दोघांची अनुक्रमे राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ आणि लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाच्या (Annabhau Sathe Vikas Mahamandal) अध्यक्षपदी निवड केली आहे.
https://www.instagram.com/p/DBLysKBpYs6
राज्य शासनाने विधानसभा आचारसंहिता लागण्यापुर्वी शेवटच्या क्षणी अनेक काळ रखडलेल्या महामंडळांच्या अध्यक्षपदी नेमणुका केल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर संभाव्य नाराजी टाळून बॅलन्स साधण्यासाठी या नियुक्त्या केल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे शहराचा विचार करता मागील दहा वर्षांपासून पर्वती मतदारसंघातून ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले हे भाजपकडून प्रयत्नशील आहेत. या मतदार संघातून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या सलग तीनवेळा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. यामुळे आगामी निवडणुकीसाठी श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar) यांनी पर्वती मधून लढण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
https://www.instagram.com/p/DBLunuepNZy
पुणे कॅन्टोंन्मेट मतदारसंघातून लोकसभेला कॉंग्रेसला मताधिक्य मिळाल्याने विद्यमान आमदार सुनिल कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याही नावाची चर्चा होती. परंतू राज्य शासनाने निवडणुकीची घोषणापुर्वी राज्यातील महामंडळांच्या रिक्त जागांवर नियुक्त्या करत पक्षार्ंगत स्पर्धा कमी करून इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे टायमिंग साधले आहे. यातच भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ ते दिलीप कांबळे यांची लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) यांची देखिल राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DBLlb4liMOH
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supreme Court Notice To Mahayuti Govt | ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या
मोफतच्या योजना म्हणजे लाच’, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस