Pune Politics News | पुणे शहरातील उमेदवारांची बंडखोरी रोखण्यास भाजपला यश; फडणवीसांचीही मध्यस्थी आली कामी
पुणे: Pune Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इच्छुक भाजप नेत्यांची (BJP Leaders) नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची मध्यस्थी कामी आली. तर काही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महत्वाचे ठरले.
https://www.instagram.com/p/DBtKt2wp-OU
शहर भाजपात जागावाटप आणि उमेदवारीवरून मोठा तिढा आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. कसबा विधानसभा मतदारसंघातून (Kasba Assembly Election 2024) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) नाराज झाले. “तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवे पण ३० वर्षे हिंदुत्ववादासाठी दिलेला कार्यकर्ता नकोय”, असे म्हणत कसब्यातील उमेदवारीला आव्हान देणारे धीरज घाटे यांचा काही काळाने जोशही मावळल्याचे पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/DBqL506p90Z
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ३० वर्ष हिंदुत्वाचे काम करुनही पक्ष उमेदवारीसाठी दखल घेत नसल्याची जाहीर नाराजी फेसबुकवर व्यक्त केली होती. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी पुढाकार घेतला.
पुण्यातील पर्वती मतदारसंघात (Parvati Assembly Election 2024) विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या उमेदवारीला आव्हान देत श्रीनाथ भिमाले (Shreenath Bhimale) यांनी मतदार संघात जोरदार तयारी सुरु केली होती आणि पक्षनेते आपल्यालाच उमेदवारी देणार असाच दृढ निश्चय ठामपणे वारंवार जाहीर केला होता.
https://www.instagram.com/p/DBqsbVFCovP/?img_index=1
पण, आयत्या वेळी पुन्हा ये माझ्या मागल्या झाले. माधुरी मिसाळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने पक्षातील इच्छुक श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले. मोहोळ यांच्या मध्यस्थीने भिमाले यांची नाराजी आणि ‘मी लढणार आणि मीच जिंकणार’ ही टॅगलाईन गळून पडली, त्यांनी माघार घेत मी पक्षासाठीच काम करणार हे धोरण स्वीकारले.
श्रीनाथ भिमाले यांच्या नाराजी नाट्यावर बोलताना माेहाेळ म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागा महायुती जिंकेल. भाजप जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असणारी संघटना असून केवळ संघटनाच नाही तर आमचा परिवार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा हाच आदेश मानण्याचे संस्कार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांत आहेत. याच दृष्टीने श्रीनाथ भिमाले यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय स्थितीवर चर्चा केली. त्यांचे संपूर्ण समाधान झाले असून ते आता निवडणुकीत सक्रीय असणार आहेत.”
भाजपकडून उमेदवारीसाठी कोणताही नवा चेहरा न देता त्याच-त्याच चेहऱ्यांना पुन्हा- पुन्हा उमेदवारी का देता ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावू लागला आणि भाजपात बंडाचे वारे फिरू लागले. मात्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी आता हे वारे थोपवले असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता मुरली अण्णांनी थोपटता दंड… भले भले राठी महारथी पडले थंड’, असे म्हटले तर नवल वाटू नये, अशी स्थिती पुण्यात दिसू लागली आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून (Vadgaon Sheri Assembly Election 2024) राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांना उमेदवारी देण्यात आली असताना याच मतदारसंघातून जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी भाजपचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी अर्ज भरण्यास गेले असता वरिष्ठांचा फोन आल्याने उमेदवारी अर्ज न भरताच त्यांना माघारी फिरावे लागले.
यावर बोलताना मुळीक म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही बिघाडी होऊ शकते या दृष्टीकोनातून अर्ज भरणे थांबवण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर लगेच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली”, असे मुळीक यांनी सांगितले.
तर कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Assembly Election 2024) अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे बंडही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने एका रात्रीत थंड झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि बालवडकर यांनी एकमेकांना पेढा भरवत मनोमिलन केल्याचे पाहावयास मिळाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा