Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात अल्पवयीन मुलाचाही सहभाग; अल्पवयीन मुलाविरुद्ध अंतिम पुरवणी अहवाल सादर

पुणे : Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी अंतिम पुरवणी अहवाल बाल न्याय मंडळाला सादर केला आहे. अल्पवयीन मुलाने आपले आई वडिलांच्या समवेत कट रचून आपल्या ऐवजी दुसर्याचे रक्त तपासणीसाठी न्याय सहायक रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले (Blood Sample Tampering Case Pune). तसेच रक्त नमुना नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर आरोपींच्या संगनमताना कट रचून तो पूर्णत्वास नेल्याचे त्यासाठी ३ लाख रुपयांची लाच कर्मचारी अतुल घटकांबळे (Atul Ghatkamble) यांच्या मार्फत डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor) याने स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, त्यांची पत्नी शिवानी विशाल अगरवाल (Shivani Vishal Agarwal) यांच्यासह ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हाळनोर, अमर गायकवाड, आशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाविरुद्ध सज्ञान नागरिकाप्रमाणे कारवाई करण्यासाठी बाल न्याय मंडळाकडून परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले जात आहे. अपघात झाल्यानंतर या मुलासह अन्य दोघांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील तपासाचा अंतिम अहवाल पोलिसांनी १५ सप्टेबर रोजी बाल न्याय मंडळाला सादर केला आहे.
https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI
अल्पवयीन मुलाने आपले वडिल आणि आई यांच्यासह ससून रुग्णालयामधील सीएमओ डॉ. श्रीहरी होळनार यांना अमर गायकवाड व आशपाक मकानदार यांचे मार्फत लाचेच्या स्वरुपात आर्थिक प्रलोभन देऊन ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील महत्वपूर्ण पुरावा बदलला. या अल्पवयीन आरोपीने स्वत:चे रक्त बदलून त्याऐवजी शिवानी अगरवाल हिचा रक्त नमुना घेण्यास श्रीहरी होळनोर यास तो सीलबंद करुन ससून हॉस्पिटल येथील रजिस्टर तसेच तपासणी फॉर्मचे बनावटीकरण करण्यास भाग पाडले.
तो अहवाल तपासणीकरता न्याय सहायक प्रयोगशाळा येथे पाठविण्याचा तसेच स्वत:चा रक्त नमुना नष्ट करण्याच्या उद्देशाने या आरोपीसह संगनमताने कट रचून तो पूर्णत्वास नेला. त्यासाठी ससून रुग्णालयातील कर्मचारी अतुल घटकांबळे याच्या करवी ठरलेली ३ लाख रुपयांची लाचेची रक्कम श्रीहरी होळनोर याने स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलाविरुद्ध भादवि कलम ३०४, २७९, ३३८, ४२७, १२० ब, २०१, २१३, २१४, ४६६, ४६७, ४७१, १०९, ३४ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७, ७(अ), ८, १२, १३, मोटार वाहन कायदा कलम १८४, १९५, ११९/११७, ३(१)/१८०, ५(१), १८१, १९९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचा पुरवणी अहवाल सादर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ
बाल न्याय मंडळासमोर या अर्जाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पोलिसांचा अहवाल लक्षात घेऊन अल्पवयीन मुलावर इतरांप्रमाणे खटला चालविण्यास अनुमती द्यायची की नाही, याचा निर्णय ४ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. (Pune Porsche Car Accident)
https://www.instagram.com/p/DAX3QlUpT7v
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’