Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने खळबळ
पुणे : Pune Railway Station | रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) करण्यात आला होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती आहे. फोन करणारा व्यक्ती पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Bomb Hoax Call)
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला (दि.८) सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही.
फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यानंतर तो पिंपरी-चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Pune Railway Station)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला