Pune Rains | पुण्यात संततधार ! 6 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुणे : Pune Rains | राज्यात पावसाने दोन दिवस उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आज पहाटे पासूनच पुणे शहरात संततधार पाहायला मिळत आहे. पुणे शहर परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत.
आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Pune Rains)
आजपासून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
४ ऑगस्ट पर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे,
- खडकवासला – ७२.८३ टक्के
- पानशेत – ९०.७२ टक्के
- वरसगाव – ९२.८२ टक्के
- टेमघर – ९३.२८ टक्के
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा