Pune Rains | पुन्हा जोरदार सरी! पुण्यात पावसाचा आणखी दोन दिवस मुक्काम; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Pune Rains

पुणे: Pune Rains | काही दिवसांची विश्रांती दिल्यानंतर पुण्यात सायंकाळी सलग तीन दिवस पावसाची हजेरी लागली असून पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शहरातही दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून पुणे शहरातही मागच्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे.

विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे.

बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सोमवारी (दि. १९) राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. २१) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.

मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे,
सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव,
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला,
तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतही
काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शहरात सोमवारी (दि.१९) झालेला पाऊस

मगरपट्टा – ३८ मिमी

हडपसर – २१ मिमी

भोर – १५ मिमी

ढमढेरे – ९.५ मिमी

वडगावशेरी – ७ मिमी

शिवाजीनगर – ४.२ मिमी

लोणावळा – ३.५ मिमी

हवेली – ३.५ मिमी

कोरेगाव पार्क – १.५ मिमी

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed