Pune Rains | मुंबई- पुण्याला पावसाने झोडपले; आणखी बरसणार; हवामान विभागाचा इशारा

Pune Rains

पुणे : Pune Rains | मागील काही दिवसांपासून मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून आकाश भरून आले आहे. यामुळे मुंबईकरांसह (Mumbai Rains) पुणेकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, आज देखील अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने (IMD Alert) वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण परिसरात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत अनेक भागांत मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आयएमडीने आज बुधवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस तर, तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान २८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून २४ अंश सेल्सिअस तापमान राहील’ असा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे.

आज पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणातील रायगड, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट आहे. (Pune Rains)

मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात पावसांच्या हलक्या सरींसह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद