Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Pune Rains

पुणे: Pune Rains | मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला झोडपून काढले आहे. अशात पुण्यासह धरण परिसरात मागील चोवीस तासांपासून सतत पाऊस सुरू आहे. धरण परिसरातील या सततच्या पावसामुळे खडकवासला, मुळशी आणि भुशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे.

अशात शहरातील एकता नगरमध्ये छातीपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. एकता नगर परिसरातील ५-६ सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. येथे अडकलेल्या २०० हून अधिक नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. अधिकच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. (Pune Rains)

एकता नगरमध्ये पाणी शिरलेल्या सोसायट्यांची नावे

द्वारका
जलपूजन
शारदा सरोवर
शाम सुंदर

मुळशी परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने मुळशी धरण जलाशय सकाळी सात वाजेपर्यंत ७० टक्के क्षमेतेने भरलेले होते. त्यामुळे आज दोन वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. याबाबतची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद