Pune Rural Police Action On Orchestra-Bar | कामशेत, वडगाव मावळच्या दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई; मध्यरात्रीनंतरही सुरु होते बार

Pune Rural Police Action On Orchestra-Bar

पुणे : Pune Rural Police Action On Orchestra-Bar | लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (IPS Sathya Sai Karthik) यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई केल्यानंतर आता वेळेचे बंधन न पाळणार्‍या बारवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. वडगाव मावळ (Vadgaon Maval) व कामशेत (Kamshet) येथील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई केली आहे.

दीपा बार अँड रेस्टॉरंट Deepa Bar & Restaurant Kamshet (कामशेत) आणि फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट Flavors Bar & Restaurant Vadgaon Maval (वडगाव मावळ) अशी कारवाई केलेल्या बारची नावे आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्याकरीता प्रशासनाने वेळेचे बंधन घालून दिले आहे. असे असताना काही हॉटेल ते बंधन पाळत नसल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना समजली.

त्याची खातरजमा करण्यासाठी कार्तिक व त्यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर ऑर्केस्ट्रा बारची तपासणी सुरु केली. त्यात या दोन ऑर्केस्ट्रा बारमध्ये वेळेचे बंधन न पाळता त्यानंतर ग्राहकांना खाद्य पदार्थ, दारु यांची विक्री केली जात असताना दिसून आले. या दोन्ही बार मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ३३ (डब्ल्यु) १३१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेलचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई यापुढेही सुरुच राहणार आहे.
हॉटेलचालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे,
असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे. (Pune Rural Police Action On Orchestra-Bar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed