Pune Rural Police News | उद्योजक बापू शितोळेकडून बंदुकीसह 215 काडतुसे जप्त; आर्थिक व्यवहारातून उरुळी कांचन परिसरात गोळीबार (Video)

पुणे : Pune Rural Police News | आर्थिक व्यवहारातून एका उद्योजकाने दोघांवर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी उद्योजक बापू शितोळे (Bapu Shitole) याच्याकडून बंदुक व बंदुकीची १७५ काडतुसे तसेच पिस्तुलाची ४० काडतुसे, दोन बॅरल, ३ रिकामी मॅगझीन असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. उद्योजकाला मदत करणार्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Firing In Uruli Kanchan)
बापू ऊर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय ४६) निलीमा बापु ऊर्फ दशरथ शितोळे (वय ४२), जिग्नेश दशरथ शितोळे (वय १९) आशा सुरेश भोसले (वय ५२), निखील अशोक भोसले (वय २५ सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १८ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत काळुराम महादेव गोते Kaluram Mahadev Gote (रा. भिवरी, ता. हवेली) यांच्यावर नोबेल हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून त्यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शरद कैलास गोते यांच्यावर एक गोळी झाडली होती.
उरुळी कांचन परिसरातील शेतकरी काळुराम गोते व शरद गोते यांनी बापू शितोळे याच्याबरोबर दीड वर्षांपूर्वी ४० लाखांचा व्यवहार केला होता़ त्यानंतर आता त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने दोघांना पैसे देण्यासाठी घरी बोलावून घेतले. पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने काळुराव व शरद यांच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. काळुराम गोते यांचा हात आणि पायाला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. गोळीबारातील मुख्य आरोपी बापू शितोळे हा शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला मदत करणार्या त्याचे कुटुंबातील इतरांना पोलिसांनी अटक केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळीचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहायक निरीक्षक राहूल गावडे, ज्ञानेश्वर बाजीगिरे, सहायक पोलीस निरीक्षक सपांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ यांनी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा